'हाऊसफुल ४'मध्ये नवाजुद्दिनची वर्णी

चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी जबरदस्त स्टारकास्ट आहेच. पण आता या यादीत आणखी एका बड्या स्टारचं नाव जोडलं गेलं आहे ते नाव आहे नवाजुद्दीन सिद्दीकी.

  • 'हाऊसफुल ४'मध्ये नवाजुद्दिनची वर्णी
SHARE

एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट असलेला हाऊसफुल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी जबरदस्त स्टारकास्ट आहेच. पण आता या यादीत आणखी एका बड्या स्टारचं नाव जोडलं गेलं आहे ते नाव आहे नवाजुद्दीन सिद्दीकी.


२५ ऑक्टोबरला प्रदर्शित

नवाझुद्दीन लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. नवाजुद्दिन एका बाबाच्या भूमिकेत झळकू शकतो. नवाजुद्दीन आणि साजिद नाडियादवाला या जोडीनं किकमध्ये काम केलं आहे.  आता ही जोडी हाऊसफुल ४ साठी एकत्र काम करणार आहे. फरहान सामजी चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून २५ ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

विश्वसुंदरी मानुषीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

प्रतिक्षा सलमानच्या लग्नाच्या गाण्याची!
संबंधित विषय
ताज्या बातम्या