Advertisement

राहुल रॉयच्या प्रकृतीत सुधारणा, व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती

अलीकडेच रुग्णालयातून राहुलचा एक व्हिडिओ समोर आला आहे यात तो आपल्या बहिणीसोबत दिसतोय.

राहुल रॉयच्या प्रकृतीत सुधारणा, व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती
SHARES

'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉय सध्या मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. कारगिल चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राहुलला अचानक ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता राहुलच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

अलीकडेच रुग्णालयातून राहुलचा एक व्हिडिओ समोर आला आहे यात तो आपल्या बहिणीसोबत दिसतोय. व्हिडिओसह राहुलनं लिहिलं आहे की, मी बरा होतोय. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आणि मला भरपूर प्रेम दिल्याबद्दल माझ्या सर्व मित्र, कुटुंबीय आणि चाहत्यांचे खूप खूप आभार. लवकरच मी परतेल.

राहुल रॉयला ICU मधून आता जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी आता राहुलला फिजिओथेअरपी देण्यास सुरूवात केली आहे.

राहुल रॉयच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचं शूटिंग करताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यावेळी त्याला श्रीनगर इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आलं.

२८-२९ नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. राहुलची प्रकृती गंभीर झाल्यानं सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे.

मागील तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या राहुलनं १९९० च्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अनु अग्रवालदेखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर राहुल 'जुनून' (१९९२), 'फिर तेरी कहानी याद आइ' (१९९३), 'नसीब' (१९९७), 'एलान' (२०११) आणि 'कॅबरे' (२०१९) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा (2007) विजेताही होता.



हेही वाचा

अभिनेत्री दिव्या भटनागरचा कोरोनामुळे मृत्यू

वरुण धवन, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांना कोरोनाची लागण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा