अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्याअभिनेत्री दिव्या भटनागरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून दिव्या व्हेंटिलेटरवर होती. अखेर मध्यरात्री ३ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.
कोरोनाची लागण झाल्यानंतर दिव्याला गोरेगावच्या एसआरवी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची प्रकृती गंभीर होती. शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
तिच्या तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्याने तिला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री २ वाजता तिची तब्येत अचानक बिघडली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर एका तासाने तिचे निधन झाले. दिव्याच्या मृत्यूची माहिती तिचा जिवलग मित्र युवराज रघुवंशी यांनी दिली.
स्टार प्लस वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ‘गुलाबो’ची भूमिका दिव्याने साकारली होती. याशिवाय सेठजी, सिलसिला प्यार का, कभी हा कभी ना, कभी सौतन कभी सहेली, प्रीतो, श्रीमान श्रीमती फिर से, तेरा यार हूं मैं सारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं होतं.
हेही वाचा -
११ वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर
मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं