तुम्हाला घाबरवायला 'ती' पुन्हा येतेय

स्त्री' चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये तीच स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. स्क्रिप्ट पूर्ण झालं की चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. दिग्दर्शक-निर्माता चित्रपट बनवण्यासाठी घाई करत नाहीत.

SHARE

मागच्यावर्षी आलेला श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री' चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. चित्रपटाच्या यशानंतर आता दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजन याचा सीक्वल म्हणजेच 'स्त्री 2' बनवण्याच्या विचारात आहेत. चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.


तीच स्टारकास्ट

'स्त्री' चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये तीच स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. स्क्रिप्ट पूर्ण झालं की चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. दिग्दर्शक-निर्माता चित्रपट बनवण्यासाठी घाई करत नाहीत. त्यांच्या मते चित्रपटातील सर्व कलाकारांनी त्यांच्या हातातील प्रोजेक्ट्स पूर्ण करावेत. मगच या चित्रपटासाठी पूर्ण वेळ द्यावा.


शेवट गोंधळात टाकणारा

चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना गोंधळात टाकेल असाच होता. प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. आता प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं स्त्रीच्या दुसऱ्या भागात मिळणार आहेत. यावेळी श्रद्धाच्या भूमिकेवर अधिक फोकस असेल, असं दिग्दर्शक-निर्माता यांनी स्पष्ट केलं. पहिल्या भागात राजकुमार, श्रद्धा यांच्याव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना आणि अभिषेक बॅनर्जी होते. प्रेक्षकांना सर्वांचे काम आवडले होते. त्यामुळे स्टारकास्ट न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.हेही वाचा -

आयुषमान-भूमी पुन्हा एकत्र

श्रीदेवीच्या दुसऱ्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
संबंधित विषय
ताज्या बातम्या