Advertisement

राणा डगुपती आणि पुलकित सम्राटचा हाथी मेरे साथी 'या' दिवशी होणार प्रदर्शित

चित्रपटात पुलकित व्यतिरिक्त बाहुबलीचा भल्लाल देव म्हणजेच राणा डग्गुबतीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

राणा डगुपती आणि पुलकित सम्राटचा हाथी मेरे साथी 'या' दिवशी होणार प्रदर्शित
SHARES

'ट्रॅश' ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुलकित सम्राट पुन्हा परत आला आहे. यावेळी अभिनेता हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत संक्रांती 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'हाथी मेरे साथी'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात पुलकित व्यतिरिक्त बाहुबलीचा भल्लाल देव म्हणजेच राणा डग्गुबतीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


पुलकितनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे की, तो पुन्हा एकदा सिनेमागृहात परतणार आहे. त्याचा आगामी ‘हाथी मेरे साथी’ चित्रपट हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत आले आहे. हा एक साहसी चित्रपट आहे.

आजच्या जगातील सध्याच्या परिस्थितीवर आधारित 'हाथी मेरे साथी' हा चित्रपट आहे. यात ग्लोबल वॉर्मिंग आणि जंगलतोड हे विषय मांडण्यात आले आहेत. याचा वन्यजीव आणि मानवी लोकसंख्या यावरही परिणाम होतो. हवामान बदल, ही एक वास्तविक समस्या आहे. जी हळूहळू पृथ्वीचा नाश करीत आहे आणि यामुळेच हे घडत आहे.हेही वाचा

अभिषेक बच्चन, राजकुमार राव स्टारर 'लुडो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

संजय दत्त कर्करोग मुक्त, मुलांच्या वाढदिवशी चाहत्यांसाठी लिहली भावनिक पोस्ट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement