Advertisement

दीपिकानं असा निभावला पत्नी धर्म

रिअल लाईफमध्ये पती-पत्नी कसलेले कलाकार बऱ्याचदा रील लाईफमध्येही त्याच भूमिकांमध्ये दिसतात. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडीही याला अपवाद नाही. दीपिकानं पत्नी धर्म निभावत आपल्या आगामी सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे.

दीपिकानं असा निभावला पत्नी धर्म
SHARES

रिअल लाईफमध्ये पती-पत्नी कसलेले कलाकार बऱ्याचदा रील लाईफमध्येही त्याच भूमिकांमध्ये दिसतात. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडीही याला अपवाद नाही. दीपिकानं पत्नी धर्म निभावत आपल्या आगामी सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे.

यंदा रणवीर सिंगचा केवळ ‘गल्ली बाॅय’ हा एकच सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमानंतर तो ’८३’ या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रॅक्टीस आणि शूटमध्ये बिझी झाला आहे. त्याची पत्नी दीपिका पदुकोणही या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी होती. या सिनेमात रणवीरनं कपिल देव यांची भूमिका साकारली असून, रोमी भाटीया यांची व्यक्तिरेखा साकारत दीपिका या सिनेमातही रणवीरची पत्नी बनली आहे. या सिनेमातील पत्नी धर्म निभावत दीपिकानं ‘८३’मधील आपलं शूटिंग पूर्ण केलं आहे.

मागील काही दिवसांपासून दीपिका या सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र होती. मुंबई उपनगरातील एका स्टुडियोत दीपिकानं नुकतंच ‘८३’चं शूट पूर्ण केलं आहे. युकेतील मोठ्या शूटिंग शेड्युलनंतर कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘८३’चं शूटिंग मुंबईत सुरू आहे. या सिनेमातील इनडोर सिन्ससाठी एक विशेष सेट उभारण्यात आला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार काही कारणास्तव जी दृश्ये लंडनमध्ये चित्रीत करणं शक्य झालं नाही ती मुंबईत शूट करण्यात येत आहेत.

 यासाठी मुंबईतील स्टुडिओमध्ये ८०च्या दशकातील काळ उभारला जात आहे. याद्वारे लंडनमधील दृश्ये रिक्रिएट करण्याचं काम करण्यात येत आहे. लग्नानंतर प्रथमच रणवीर आणि दीपिका ही रिअल लाईफ जोडी या चित्रपटात झळकणार असल्यानं त्यांच्या चाहत्यांना या सिनेबाबत विशेष कुतूहल आहे. हा सिनेमा पुढल्या वर्षी १० एप्रिल रोजी हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही बनणार आहे.हेही वाचा -

या कलाकारांनी बांधल्या ‘साता जल्माच्या गाठी’

... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना
संबंधित विषय
Advertisement