Advertisement

सलमानचा 'भारत' पहिल्या सहामाहीतला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आंकड़ेवारीनुसार, 'भारत' चित्रपटानं व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट आणि डिजिटल श्रेणींमध्ये सर्वाधिक म्हणजेच १०० गुण मिळवले आहेत. ज्यामध्ये सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट्सही सामिल आहेत.

सलमानचा 'भारत' पहिल्या सहामाहीतला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट
SHARES

२०१९ या वर्षानं आता पूर्वार्धाकडून उत्तरार्धाकडं वाटचाल सुरू केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्या सहा महिन्यात बरीच उलथापालथ झाली. यात सलमानच्या 'भारत' या चित्रपटानं सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरण्याचा बहुमान पटकावला आहे.


१०० गुण 

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'भारत'ला तिकीट खिडकीवर चांगला प्रतिसाद मिळाला. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ही हा चित्रपट यंदाच्या सहामाहीतला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीनं लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या सहामाहीत लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांची यादी जाहिर केली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आंकड़ेवारीनुसार, 'भारत' चित्रपटानं व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट आणि डिजिटल श्रेणींमध्ये सर्वाधिक म्हणजेच १०० गुण मिळवले आहेत. ज्यामध्ये सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट्सही सामिल आहेत.


 दुसऱ्या स्थानावर कलंक

'भारत'नंतर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर दुसऱ्या स्थानावर करण जौहरचा 'कलंक' आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ठीक-ठाक कमाई केली होती, पण आश्चर्यजनकरित्या २२.७८ गुणांसह हा चित्रपट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ४२.६ गुणांसह 'कलंक'नं डिजिटल (सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट)मध्ये जास्त स्कोर केला आहे, तर न्यूज प्रिंटमध्ये २२.५६ आणि व्हायरल न्यूज श्रेणीत १०.०९ गुण मिळवले आहेत. विकी कौशलचा ब्लॉकबस्टर 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्जिकल स्ट्राइकवर असलेल्या या चित्रपटानं सर्व कॅटॅगरीत एकत्रितपणं २२.३५ गुण मिळवले आहेत. उरीनं ४०.३० गुणांसह डिजिटल आणि २८.६६ गुणांसह न्यूज प्रिंटमध्ये चांगला स्कोर केला आहे.


उत्तम सुरुवात

महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'बदला' या चित्रपटानं सर्व श्रेणींमध्ये १७.५३ गुणांसह चौथं स्थान पटकावलं आहे, तर अक्षय कुमारचा 'केसरी' एकूण १६.१८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, सलमान खान बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचा 'अनडिस्प्युटेड सुपरस्टार' आहे. त्याचे सिनेमे चार्ट्सवर नेहमीच अग्रस्थानी असतात. मात्र आश्चर्यजनकरित्या 'मणिकर्णिका' सारखा चित्रपट सहाव्या क्रमांकावर, 'ठाकरे' सातव्या क्रमांकावर, 'गली बॉय' आठव्या क्रमांकावर आणि 'टोटल धमाल' नवव्या क्रमांकावर आहे. 'कबीर सिंह' सिनेमानं यंदाच्या दूसऱ्या सहामाहीला उत्तम सुरुवात करून दिली आहे. स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर सध्या हा चित्रपट दहाव्या क्रमांकावर आहे. लवकरच वार्षिक रँकिंगमध्ये हा चित्रपट इतर चित्रपटांना मागे टाकत पुढं जाईल, असं अनुमान आहे.



हेही वाचा -

मराठीतला पहिलाच प्रयोग, ३० हून अधिक कलाकारांनी गायलं 'स्माईल प्लीज'चं अँथम साँग

आशाताईंना तोड नाही, ८६ व्या वर्षी गायलं रोमँटीक साँग




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा