Advertisement

गायक केके पंचतत्वात विलीन, अखेरचा निरोप देण्यासाठी 'या' सेलिब्रिटींची हजेरी

केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

गायक केके पंचतत्वात विलीन, अखेरचा निरोप देण्यासाठी 'या' सेलिब्रिटींची हजेरी
SHARES

बॉलिवूड गायक केके पंचतत्वात विलीन झाले आहेत. त्यांचा मुलगा नकुल याने त्यांना मुखाग्नी दिला. केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

केके यांची मुलगी तमाराने वडिलांच्या फ्यूनरल कार्डसोबत एक नोट शेअर केली आहे. तिने लिहिले 'लव्ह यू फॉरेव्हर डॅडी'. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांनी सकाळी 10:30 ते 12:30 ही वेळ ठेवली होती.

त्यानंतर अंधेरीस्थित त्यांच्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. केके यांच्या अंत्यदर्शनासाठी इंडस्ट्रीतील त्यांचे जवळचे मित्र आणि सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचले होते. केके यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले होते.

सुदेश भोसले, अभिजीत भट्टाचार्य, अलका याज्ञिक यांच्यासह अनेक कलाकारांनी केके यांच्या घरी जाऊन त्यांचे अखेरचे दर्शन घेतले.

के.के. (कृष्णकुमार कुन्नथ) यांचे मंगळवारी वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले होते. कोलकातामध्ये लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना तत्काळ CMRI (कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

पोलिसांनी केके यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे नोंदवले आहे. कोलकातास्थित न्यू मार्केट पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, केके यांच्या चेहरा आणि डोक्यावर जखमा आढळल्या आहेत.

केके यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले आहे. कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात केके यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सुमारे दीड तास चाललेल्या या पोस्टमॉर्टेमचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे.हेही वाचा

मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

गायक केके यांचे निधनापूर्वीचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांचे आरोप...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा