Advertisement

गायक कुमार सानू कोरोना पॉझिटिव्ह

लोकप्रिय गायक कुमार सानू यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

गायक कुमार सानू कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

लोकप्रिय गायक  कुमार सानू यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ई-टाईम्सच्या मते, अभिनेता लॉस एंजलसला आपल्या कुटुंबासमवेत जाण्यासाठी निघाले होते. त्यांची पत्नी आणि दोन मुली अमेरिकेत आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून ते त्यांच्याकडे जाण्यासाठी प्रयत्न करत होते. 

कुमार सानू आपला वाढदिवस २० ऑक्टोबरला कुटुंबासोबत साजरा करणार होते. याशिवाय नवरात्रौत्सवात कुटुंबासोबत वेळ घालवण्याची त्यांचीच इच्छा होती. त्यासाठीच ते त्यांच्याकडे जात होते. पण आता त्याच्या योजना रखडल्या गेल्या आहेत. त्यांना सध्या क्वारंटाऊन करण्यात आले आहे. 

अलीकडेच कुमार सानू आपल्या लहान मुलाची जाहिरात करताना बिग बॉसच्या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये भाग घेणार होते. कुमार सानू यांचा मुलगा बिग बॉस १४ मध्ये भाग घेत आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच त्याची देखील गायक होण्याची इच्छा आहे. शोमध्ये भाग घेण्यापूर्वी कुमार सानू यांनी आपल्या चाहत्यांना मुलाचे समर्थन करण्याचं आवाहन केलं होतं.

यापूर्वी कुमार सानू यांनी पत्नीचा वाढदिवस साजरा करून डिसेंबरमध्ये भारतात परत येण्याची योजना आखली होती. तथापि, आता असं दिसत आहे की कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस ते अमेरिकेला जाऊ शकतील.हेही वाचा

अभिनेता रणवीर सिंहच्या गाडीचा अपघात, व्हिडिओ व्हायरल

देशासाठी पहिला ऑस्कर जिंकणाऱ्या कॉश्च्युम डिझायनर भानु अथैया यांचं निधन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement