Advertisement

दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली, लीलावती रुग्णालयात दाखल


दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली, लीलावती रुग्णालयात दाखल
SHARES

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालवली असून त्यांना छातीच्या संसर्गामुळं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. दरम्यान यात चिंता करण्यासाठी कोणतीही बाब नसून ते नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आल्याचं लीलावती हॉस्पिटलचे ऑपरेशन संचालक डॉ. अजय पांडे यांनी स्पष्ट केलं आहे.


प्रकृतीत सुधारणा

या आधी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात त्यांना डिहायड्रेशन झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. दिलीप कुमार हे गेली कित्येक वर्ष किडनीच्या आजारानं ग्रस्त असून सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या ट्विटर पेजद्वारे देण्यात आली आहे.


अभिनयाचा सम्राट

ट्रॅजडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांनी १९४४ साली अभिनयाला सुरूवात केली. ज्वार भाटा हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तब्बल सहा दशक बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे दिलीप कुमार यांनी १९९८ साली किला या चित्रपटात अखेरचा अभिनय केला. आपल्या विशिष्ट अभिनय शैलीनं प्रेक्षकांना अक्षरक्ष वेड लावलं होतं. तब्बल आठ वेळा सर्वोत्कृष्ठ अभिनेता या श्रेणीत फिल्मफेअर अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. त्याव्यतिरिक्त त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.



हेही वाचा-

'काहे दिया परदेस' फेम शुभांगी जोशी यांचं निधन

‘बोगदा’मधील 'या' दृश्यात सुहास जोशींनी राखला संयम



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा