Advertisement

बालिका वधू मालिकेतील दादी सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक

मुंबईतील रुग्णालयात सुरेखा यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय त्यांची आर्थिक स्थितीही चांगली नसल्यानं त्यांचे कामकाज पाहणारे विवेक सिधवानी यांनी मदत मागितली आहे.

बालिका वधू मालिकेतील दादी सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक
SHARES

टीव्ही सीरियल बालिका वधूमध्ये दादी सा आणि बधाई हो फिल्ममध्ये दादीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सुरेखा सीकरी (Surekha Sikri) यांना पुन्हा ब्रेन स्ट्रोक आला आहे. 

मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय त्यांची आर्थिक स्थितीही चांगली नसल्यानं त्यांचे कामकाज पाहणारे विवेक सिधवानी यांनी मदत मागितली आहे.

सुरेखा सीकरी यांना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरेखा यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळते आहे.

विवेक सिधवानी यांनी सांगितलं की, आज सकाळी त्यांना स्ट्रोक आला. त्यांना ICUत ठेवण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्या स्थिर आहेत.  

हेही वाचा : अर्जुन कपूरनंतर मलायका अरोराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा यांची आर्थिक परिस्थितीदेखील सध्या ठिक नाही. उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीचा हात हवा आहे. फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांकडे त्यांनी मदत मागितली आहे. आपल्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुरेखा सीकरी यांना २०१८ साली देखील ब्रेन स्ट्रोक आला होता. २०१९ मध्ये हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखातीत त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. मुलाखतीत त्यांनी सांगितलं, "मी बाथरूममध्ये पडले होते. ज्यामुळे माझ्या डोक्याला दुखापत झाली होती. मला ब्रेन स्ट्रोक झाल्यानं मी अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली. तब्येत बिघडत गेल्यानं मी शूटिंग करू शकले नाही"

सुरेखा यांना नॅशनल फिल्म अवॉर्डही मिळाले आहेत. 'बधाई हो' सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याआधी त्यांना तमस (१९९८) आणि माम्मो (१९९५) या सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.



हेही वाचा

"हो मी ड्रग्ज घ्यायचे", कंगनाचा जुना व्हिडिओ व्हायरल

तेलगु अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं निधन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा