Advertisement

कौंटुंबिक हिंसाचाराप्रकरणी हनी सिंहच्या पत्नीनं भरपाई म्हणून मागितली 'इतकी' रक्कम

बॉलिवूड सिंगर आणि रॅपर हनी सिंहवर कौटुंबिक हिंसाचारासारखे गंभीर आरोप त्याच्या पत्नीनं लावले आहेत.

कौंटुंबिक हिंसाचाराप्रकरणी हनी सिंहच्या पत्नीनं भरपाई म्हणून मागितली 'इतकी' रक्कम
SHARES

बॉलिवूड सिंगर आणि रॅपर हनी सिंहवर कौटुंबिक हिंसाचारासारखे गंभीर आरोप त्याच्या पत्नीनं लावले आहेत.  हनी सिंहसोबतच त्याचे आईवडील आणि लहान बहिणीविरोधात दिल्ली तीज हजारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसंच मानसिक, आर्थिक छळ केल्याचा आरोप करत भरपाईमध्ये मोठी रक्कम मागितली आहे.

न्यायालयात 160 पानांची याचिका हनी सिंहची पत्नी शालिनी तलवारनं सादर केली आहे. हनी सिंह आणि त्याच्या कुटुंबातील तिघांविरुद्ध ही याचिका दाखल केली आहे. तसंच तिने भरपाई म्हणून मोठी रक्कम मागितली आहे.

शालिनीने म्हटलेंआहे, की ती दिल्लीच्या ज्या घरात राहते त्याचे भाडे तब्बल ५ लाख रुपये आहे. तिनं न्यायालयात विंनती केली आहे, की हनी सिंहनं ही रक्कम द्यावी. त्याचबरोबर तिनं आपल्या दागिन्यांची एक मोठी यादी दिली आहे.

तसंच तिनं अंतर्गत भरपाई म्हणून १० करोड रुपयांची मागणी केली आहे. शालिनीनं याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं २८ ऑगस्टपर्यंत हनी सिंहला जबाब नोंदवण्याची नोटीस दिली आहे.

हनी सिंहच्या पत्नीनं लग्नाच्या अनेक वर्षांनंतर आपले मौन सोडत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. हनी सिंहचा सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या गायकांमध्ये समावेश होतो.

मीडिया रिपोर्टनुसार हनी सिंह तब्बल १७३ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. दरवर्षी जवळजवळ ४२ कोटी रुपयांची कमाई हनी सिंह करतो. त्याच्या पत्नीनं याचिकेमध्ये म्हटलं आहे, की तो आपल्या प्रत्येक शोमधून कोट्यावधी रुपये कमावतो.

हनी सिंहजवळ देशात विविध ठिकाणी बंगले आहेत. त्यांची किंमतसुद्धा कोटीमध्ये आहे. एक गाणे गाण्यासाठी हनी सिंह १५ लाखांची रक्कम घेतो. तो देशातील सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या लोकांमधील एक आहे. त्याला महागड्या गाड्यांची खुपच आवड आहे. त्याच्याजवळ BMW, ऑडी आर 8, ऑडी क्यू 7,जॅगुआर, रोल्स रॉयस अशा अनेक गाड्या आहेत.



हेही वाचा

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी पाहता येणार

प्रियंका चोप्राच्या रेस्टॉरंटची अमेरिकेत चर्चा, भारतीय पदार्थांसोबत मुंबईच्या वडापावचीही क्रेझ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा