Advertisement

हयात रिजन्सी हॉटेलच्या १९३ कर्मचाऱ्यांची औद्योगिक न्यायालयात धाव

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १९३ कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.

हयात रिजन्सी हॉटेलच्या १९३ कर्मचाऱ्यांची औद्योगिक न्यायालयात धाव
SHARES

मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध अशा हयात रेजन्सी (Hyatt regency) हॉटेलनं सोमवारी रात्री तडकाफडकी हॉटेलचा कारभार बंद करण्याचा निर्णय घेतला. हॉटेलच्या मालकाकडे कर्मचाऱ्यांना (Employee) पगार (salary) देण्यासाठी आणि कारभार चालवण्यासाठी निधी उपलब्ध नसून हॉटेल व्यवसायामधून टीकून राहण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी हॉटेल बंद करत असल्याचं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं.

या निर्णयानंतर आता हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १९३ कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयामध्ये (Industrial court) धाव घेतली आहे. न्यायालयानं पुढील सुनावणी २८ जून रोजी असल्याचं स्पष्ट केल. तसंच तोपर्यंत कंपनीला कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करता येणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

कर्मचाऱ्यांनी मागील दोन महिन्यापासून आम्हाला पगार देण्यात आला नव्हता. तसंच सोमवारी हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी हॉटेलमध्ये ६० ते ८० टक्के बुकींग मागील काही दिवसांपासून फुल्ल असल्याचा दावाही करण्यात आलाय.

मुंबईतील हयात रेजन्सीची मालकी असणाऱ्या एशियन हॉटेल्स (वेस्ट) कंपनीकडे आहे. इकनॉमिक टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार या कंपनीनं यस बँकेकडून घेतलेलं ४ कोटी ३२ लाखांचं कर्ज थकलेलं आहे. अशाच आता कंपनीने हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने केलेल्या खुलाश्यानुसार यस बँकेने कंपनीच्या व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. करोनामुळे आम्हाला बँकेचं कर्ज फेडता आलं नसल्याचा दावा कंपनीनं केलाय. आम्हाला सध्या सरकारी कर, व्हेंडर्सचे पैसे आणि कर्मचाऱ्यांचा पगार देता येणार नाहीय. कंपनीच्या व्यवहारांवर बँकेकडून बंदी घालण्यात आल्याचा दावा, एशियन हॉटेल्स (वेस्टने) केला आहे.

मुंबईथील सहारा विमानतळ मार्गावर असणारे हॉटेल सोमवार रात्रीपासून बंद करण्यात येत असलं तरी दिल्लीतील हॉटेल सुरु राहणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. करोना कालावधीतील निर्बंध, कमी झालेली पर्यटक संख्या यासाऱ्या गोष्टींमुळे कंपनीसमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.हेही वाचा

'या' कारणास्तव मुंबईतील हयात रिजेंसी हॉटेल बंद

डेटॉल कंपनीचं अनोखं अभियान, लोगोच्या जागी आता 'यांचे' फोटो झळकणार

Read this story in English
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा