Advertisement

डेटॉल कंपनीचं अनोखं अभियान, लोगोच्या जागी आता 'यांचे' फोटो झळकणार

अभियानात कंपनीनं त्यांच्या लोगोच्या जागी कोरोना वॉरीयर्सचे फोटो आणि त्यांची प्रेरक कहाणी सांगितली आहे.

डेटॉल कंपनीचं अनोखं अभियान, लोगोच्या जागी आता 'यांचे' फोटो झळकणार
SHARES

जंतू, विषाणू पासून आपल्या उत्पादनानं सुरक्षा देणाऱ्या दिग्गज डेटॉल कंपनीनं अनोखं अभियान सुरू केलं आहे. ‘डेटॉल सॅल्यूट’ नावानं सुरू केलेल्या या अभियानात कंपनीनं त्यांच्या लोगोच्या जागी कोरोना वॉरीयर्सचे फोटो आणि त्यांची प्रेरक कहाणी सांगितली आहे.

देशभरातील १०० कहाण्या यासाठी तयार केल्या आहेत. त्यात निस्वार्थी भावनेनं करोना काळात सर्वसामान्य नागरिकांची मदत करून त्यांचे रक्षण केल्याबद्दल सन्मान म्हणून हे अभियान सुरू केलं गेलं आहे.

कंपनीने त्यांच्या हात धुण्याच्या लिक्विड हँडवॉश पॅकवर कोरोना वॉरियर्सचे फोटो आणि कहाणी प्रदर्शित केली आहे. कंपनीनं वेबसाईट www.dettolsalute.com या नावानं देशभरातील नागरिकांसाठी जारी केली आहे. येथे करोना वॉरीयर्सच्या प्रेरक कथा लोक सांगू शकणार आहेत.

स्टोरीचा व्हर्च्युअल पॅक बनवून सोशल मीडियावर शेअर करून कोव्हिड रक्षकांची ओळख करून देण्याची सुविधा दिली गेली आहे.

रेकीट, हेल्थ अँड न्युट्रीशनचे दक्षिण आशिया मार्केटिंग डायरेक्टर दिलेन गांधी या संदर्भात म्हणाले, डेटॉल रक्षक वारसा सोबत जे करोना रक्षक या कार्यात मृत्युमुखी पडले त्यांना ही श्रद्धांजली आहे.

#DettolSalutes मोहिमेचा भाग म्हणून गेल्या आठवड्यात डेलॉकडून एक गाणं लाँच केलं आहे. वैविध्यपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याच्या अनुषंगानं डेटटॉलनं वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणं लाँच केलं आहे. डेटॉल हे प्रथमच राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर एएसएलची जाहिरात दाखवणार आहेत.

४ दशलक्ष # डेटॉलसॅल्यूट पॅक ई-कॉमर्स साईटवरआणि जूनमधील तिसऱ्या आठवड्यापासून भारतात ५ लाख स्टोअरमध्ये उपलब्ध असतील.



हेही वाचा

तृतीयपंथीयांसाठी राज्यातील पहिलं निवारा केंद्र कल्याणमध्ये सुरू

'या' कारणास्तव मुंबईतील हयात रिजेंसी हॉटेल बंद

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा