Advertisement

सर्वात इनोव्हेटिव्ह शहरांच्या यादीत मुंबई 92 व्या स्थानी


सर्वात इनोव्हेटिव्ह शहरांच्या यादीत मुंबई 92 व्या स्थानी
SHARES

जगातील 100 आघाडीच्या अभिनव (इनोव्हेटिव्ह) शहरांच्या यादीत मुंबईला 92 वं स्थान मिळालं आहे. जागतिक अभिनव शहरांची यादी नुकतीच '2 थिंक नो' या व्यावसायिक माहिती देणाऱ्या संस्थेने जाहीर केली आहे. यामध्ये जपानची राजधानी असलेल्या टोकियोने प्रथम क्रमांक पटकावलं आहे.


यंदा मुंबईची घसरण

या यादीत मुंबईला 92 व्या स्थानी ठेवण्यात आलं आहे. तर कर्नाटकची राजधानी बंगळुरुला 139वं स्थान मिळालं आहे. 2017 मध्ये '2 थिंक नो' ने जारी केलेल्या या यादीत महाराष्ट्राची राजधानी 90 व्या स्थानावर होती.


टॉप 500 च्या यादीत

इनोव्हेटिव्ह शहरांच्या टॉप 500च्या यादीत भारतातील 13 शहरांचा समावेश आहे. चेन्नई (252), कोलकता (283), हैदराबाद (316), अहमदाबाद (345), पुणे (346), जयपुर (393), सुरत (424), लखनऊ (442), कानपुर (448) आणि मदुरै (452) या शहरांना या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे.


टॉप 10 च्या यादीत

टॉप 10 च्या यादीत सॅन फ्रांसिस्को, न्यूयॉर्क, लॉस एंजल्स, सिंगापुर, बोस्टन, टोरंटो, पॅरिस आणि सिडनी यांचा समावेश करण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा