Advertisement

७ दिवसांत पेट्रोल-डिझेल ४ रुपयांनी महागले

कच्च्या तेलाच्या किमती त्यांच्या फेब्रुवारीच्या उच्चांकी १४० डॉलर प्रति बॅरलवरून १०३ डॉलरवर घसरल्या आहेत. तरीही पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत आहेत.

७ दिवसांत पेट्रोल-डिझेल ४ रुपयांनी महागले
SHARES

सरकारी तेल कंपन्यांनी आज आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. सोमवारी पेट्रोल जवळपास ३० पैसे आणि डिझेल ३५ पैसे प्रति लीटर महाग (Petrol Diesel Prices Hike) झालं आहे.

नवीन दरांनुसार दिल्लीत पेट्रोल ९९.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७७ रुपये प्रति लिटर विकले जाईल. मुंबईत पेट्रोल ११४.०८ रुपये आणि डिझेल ९८.४८ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जाणार आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. मागील एक आठवड्यात पेट्रोलच्या किमतीत चार रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलही जवळपास इतकंच महाग झालं आहे. एका आठवड्याआधी जवळपास १३७ दिवस इंधन दरात कोणतेही करण्यात आले नव्हते.

कच्च्या तेलाच्या किमती त्यांच्या फेब्रुवारीच्या उच्चांकी १४० डॉलर प्रति बॅरलवरून १०३ डॉलरवर घसरल्या आहेत. तरीही गेल्या सहा दिवसांत तेल कंपन्यांनी पाच वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. तेल कंपन्यांचा दृष्टिकोन पाहता, भाववाढीचा हा क्रम पुढील १५ दिवस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.

मूडीज रेटिंग एजन्सीनं एक अहवाल जारी केला होता की, भारतातील सर्वोच्च किरकोळ इंधन विक्रेते IOC, BPCL आणि HPCL नं नोव्हेंबर ते मार्चदरम्यान सुमारे २.२५ अब्ज डॉलर्सचा (रु. १९ हजार कोटी) महसूल गमावला आहे.

रेटिंग एजन्सीनं म्हटलं आहे की, नुकसान टाळण्यासाठी सरकारनं रिफायनरीला किमती वाढवण्याची परवानगी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. सलग दोन दिवस ८०-८० पैशांनी वाढ केल्यानंतर, मूडीजनं म्हटलं होतं की, हे सूचित करते की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एकाच वेळी न वाढवता त्या हळूहळू वाढतील.

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता.

तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.



हेही वाचा

'काश्मीर फाइल्स' चित्रपट पहाल तर दुधावर सवलत मिळेल

मुंबईत एसी भाडेतत्वावर; महिन्याला भरा ‘इतके’ भाडे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा