Advertisement

'काश्मीर फाइल्स' चित्रपट पहाल तर दुधावर सवलत मिळेल

एका डेअरीच्या मालकानं आपल्या ग्राहकांना ही ऑफर दिली आहे.

'काश्मीर फाइल्स' चित्रपट पहाल तर दुधावर सवलत मिळेल
SHARES

काश्मीर फाइल्स या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. लोकांना हा चित्रपट आवडला असून बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराविषयी सांगण्यात आले आहे. आता या चित्रपटासाठी एका दूध विक्रेत्यानं अनोखा पुढाकार घेतला आहे.

घाटकोपरच्या नायडू कॉलनी इथं असलेल्या दूधसागर डेअरीचे मालक अनिल शर्मा यांनी आपल्या ग्राहकांना 'काश्मीर फाईल्स' चित्रपटाची तिकिटे दाखवून दुधावर सवलत मिळू शकेल, अशी ऑफर दिली आहे.

काश्मीर फाइल्स चित्रपटानं २०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे ज्यांनी हा चित्रपट पाहिला, ज्यांना तो आवडला ते इतरांनाही तो पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

मुंबईस्थित एका दूध व्यावसायिकानं एक संकल्पना राबवली हे. अनिल शर्मा असं त्याचं नाव आहे. अनिल शर्मा यांनी त्यांच्या दुधाच्या दुकानाबाहेर एक बॅनर लावला आहे.

ज्यामध्ये लिहिलं आहे की, जो कोणी काश्मीर फाइल्स चित्रपट पाहील आणि त्याचे तिकीट दाखवेल, त्याला गायीच्या दुधावर २० टक्के सूट मिळेल. म्हणजेच ४४ रुपये लिटर दुध ३५ रुपये प्रति लिटर मिळेल.

अधिकाधिक लोकांनी हा चित्रपट पाहावा हा यामागचा अनिल शर्माचा हेतू आहे. मात्र यासाठी ते एवढी सवलत देऊन आपले नुकसान करायलाही तयार आहे.हेही वाचा

झोमॅटोची १० मिनिटात डिलिव्हरी, रोहीत पवार म्हणाले...

मुंबई पोलिसांच्या मदतीला धावून आले आनंद महिंद्रा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा