सीकेपी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्यानंतर बँकेचे लाखो खातेदार हवालदील झाले आहेत. मात्र, या खातेदारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. सीकेपी बँकेच्या 99.2 टक्के ठेवीदारांना त्यांचे पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता लिक्विडेशन प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे डीआयसीजीसी कायद्याअंतर्गत सीकेपी बँकेच्या खातेदारांना पैसे परत केले जातील. बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातील रकमेच्या हिशोबाने 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल.
सीकेपी बँकेत एकूण 1.32 लाख ठेवीदार आहेत. यामध्ये 99.2 टक्के ठेवीदार असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये 5 लाखांपेक्षा कमी रक्कम आहे. त्यामुळे या खातेदारांना आपली पूर्ण रक्कम मिळणार आहे. सीकेपी सहकारी बँकेबाबत आरबीआयचे सीजीएम (कम्युनिकेशन्स) योगेश दयाळ यांनी ट्वीट केलं आहे की, 'मुंबईस्थीत सीकेपी सहकारी बँक 2014 पासून आरबीआयच्या इनक्लुसिव्ह डायरेक्शन अंतर्गत आहे. रिव्हायव्हची शक्यता कमी असल्याने या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या बँकेच्या 1,32,170 ठेवीदारांपैकी 99.2 ठेवीदारांचे डीआईसीजीसी कडून पूर्ण पैसे परत करण्यात येतील.CKP Co-op Bank Ltd., Mumbai has been under All Inclusive Directions of @RBI since 2014. As there was no scope for revival of the bank, its licence has been cancelled. Out of 132170 depositors of the bank, about 99.2% will get full payment of their deposits from DICGC.
— Yogesh Dayal (@YogeshDayal17) May 3, 2020
हेही वाचा -