Advertisement

पाकिस्तानमुळे एअर इंडियाला झाला 'एवढा' तोटा

या आर्थिक वर्षात एअर इंडियाला २६ हजार ४०० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. मात्र, कंपनी चालवण्याचा खर्च वाढत असल्याने आणि विदेशी चलनाच्या विनिमिय दरामुळे कंपनी तोट्यात आहे.

पाकिस्तानमुळे एअर इंडियाला झाला 'एवढा' तोटा
SHARES

सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण ८४०० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. कंपनीचा आॅपरेटिंग तोटा ४६०० कोटींवर गेला आहे. या आर्थिक वर्षात एअर इंडियाला २६ हजार ४०० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. मात्र, कंपनी चालवण्याचा खर्च वाढत असल्याने आणि विदेशी चलनाच्या विनिमिय दरामुळे कंपनी तोट्यात आहे. 


हवाई हद्द बंद

तेलाच्या किमती वाढल्याने आणि पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांना त्यांच्या हवाई हद्दीतून जाण्यास बंदी घातल्याने एअर इंडियाचा तोटा वाढला आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केल्याने पाकिस्तानने २६ फेब्रुवारीला आपली हवाई हद्द भारतीय विमान कंपन्यांसाठी बंद केली. त्यामुळे एअर इंडियाला २ जुलैपर्यंत ४९१ कोटी रुपयांचं नुकसान झालं. 


नफ्यात येण्याचं लक्ष्य

एअर इंडियाने २०१९-२० या चालू आर्थिक वर्षात नफ्यात येण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विमान इंधनांच्या किमती घटल्या आणि विदेशी चलनाच्या विनिमिय दरात जास्त चढ-उतार झाला नाही तर कंपनीला ७०० ते ८०० कोटी रुपयांचा आॅपरेटिंग नफा होण्याची कंपनीला आशा आहे. हेही वाचा -

सरकारी बँकांची तब्बल ३२ हजार कोटींची फसवणूक
संबंधित विषय
Advertisement