Advertisement

'फॅमिली फी' भरा, एकत्रित विमान प्रवास करा!

आतापर्यंत ही सुविधा केवळ पुढच्या रांगेतील आसनांसाठी तसंच ठराविक आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी उपलब्ध होती. त्यात आता मधल्या रांगेचाही समावेश करण्यात आला आहे. बाजूला बसलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत लहान मुलांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागू नये, म्हणून पालक प्राधान्याने हे शुल्क (फॅमिली फी) भरून आसनाचं आरक्षण करणं पसंत करतात.

'फॅमिली फी' भरा, एकत्रित विमान प्रवास करा!
SHARES

एअर इंडियाने सोमवारी प्रवाशांना देशांतर्गत (डोमेस्टिक) आणि आंतरराष्ट्रीय (इंटरनॅशनल) मार्गांवरील विमान प्रवासासाठी शुल्क आकारून आसननिवडीची सुविधा उपलब्ध करून दिली. या निर्णयाचा फायदा कुटुंबासोबत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

प्रवाशांना फायदा

आतापर्यंत ही सुविधा केवळ पुढच्या रांगेतील आसनांसाठी तसंच ठराविक आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी उपलब्ध होती. त्यात आता मधल्या रांगेचाही समावेश करण्यात आला आहे. बाजूला बसलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत लहान मुलांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागू नये, म्हणून पालक प्राधान्याने हे शुल्क (फॅमिली फी) भरून आसनाचं आरक्षण करणं पसंत करतात.

किती रुपये शुल्क?

एअर इंडियाने ट्रॅव्हल एजंट्सकरीता परिपत्रक काढलं आहे. त्यानुसार देशांतर्गत प्रवासाकरीता आवडीचं आसन निवडण्यासाठी (मधल्या आसनांकरीता) १०० रुपयांपासून पुढे अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल. तर खिडकीजवळील आसनांसाठी अतिरिक्त २०० रुपये मोजावे लागतील.

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (केवळ काठमांडू मार्ग वगळता) हेच अतिरिक्त शुल्क २०० रुपयांपासून सुरू होतात. तर खिडकीजवळील आसनांसाठी २४० ते १,५०० रुपयांदरम्यान शुल्क मोजावे लागतील. 'इमर्जन्सी एक्झिट'च्या रांगेतील आसनांसाठी अतिरिक्त शुल्क ८०० ते १,५०० रुपयांदरम्यान (मार्गांनुसार) आहेत.

हेही वाचा-

नवा 'आयटीआर' फाॅर्म आला, ३१ आॅगस्टपर्यंत करा रिटर्न फाईल

क्रिप्टोकरन्सीच्या खरेदीवर आरबीआयची बंदी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा