Advertisement

कफल्लक! एअर इंडियाने काढले मुंबईतले ३० फ्लॅट विकायला

डोक्यावरील कर्जाचं ओझं दूर करण्यासाठी एअर इंडियाने पैसे मिळवण्याचे इतर स्त्रोत शोधले आहेत. त्यातील एक स्त्रोत म्हणजे धूळ खात पडून असलेल्या मालमत्तांची विक्री. मुंबईतील अशाच ३० फ्लॅटचा लिलाव करत एयर इंडिया ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे.

कफल्लक! एअर इंडियाने काढले मुंबईतले ३० फ्लॅट विकायला
SHARES

विमान वाहतूक सेवेतील एकेकाळची आघाडी विमान कंपनी एयर इंडिया आर्थिक संकटात अडकल्याने कफल्लक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे डोक्यावरील कर्जाचं ओझं दूर करण्यासाठी एअर इंडियाने पैसे मिळवण्याचे इतर स्त्रोत शोधले आहेत. त्यातील एक स्त्रोत म्हणजे धूळ खात पडून असलेल्या मालमत्तांची विक्री. मुंबईतील अशाच ३० फ्लॅटचा लिलाव करत एयर इंडिया ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे.


किती रक्कम मिळणार?

एयर इंडियाने मुंबईसह देशभरातील मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण लिलावातून एयर इंडियाला कमीत कमी ३६५ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. या लिलावात मुंबईतील ३० फ्लॅटचा समावेश आहे. या ३० फ्लॅटच्या लिलावासाठी एयर इंडियाने नुकत्याच निविदा काढल्या असून इच्छुकांना २१ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज करत या लिलावत सहभागी होता येणार आहे. या ३० फ्लॅटचा २२ फेब्रुवारीला लिलाव होणार आहे.कुठे आहेत फ्लॅट्स?

मुंबईतील ३० फ्लॅटच्या लिलावातून एयर इंडियाला किमान २५६ कोटींची कमाई होणं अपेक्षित आहे. या ३० फ्लॅटमध्ये वांद्रयातील १४, कफ परेडमधील ३, मालाडमधील ८, खारमधील ३, सांताक्रूझमधील १ आणि माहिममधील १ फ्लॅटचा समावेश आहे. २ आणि ३ बीएचकेचे हे फ्लॅट असून ९८ लाख ते ९ कोटी अशा या फ्लॅटची आधारभूत किंमत ठेवण्यात आली आहे.


२०० कोटींची बिल्डिंग

तर, वांद्रयात १४ फ्लॅटची एक बिल्डिंग असून या संपूर्ण बिल्डिंगच्या लिलावासाठी २०० कोटींची आधारभूत किंमत लावण्यात आली आहे. आता या लिलावाला कसा प्रतिसाद मिळतो आणि एयर इंडियाची तिजोरी किती फुगते हे आता २२ फेब्रुवारीलाच समजेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा