Advertisement

मेट्रो 3 लाईनवर Airtel पुरवणार पहिली 5G कनेक्टिव्हिटी सेवा

यापूर्वी, प्रतिस्पर्धी टेल्को व्होडाफोन आयडियाने सांगितले होते की त्यांनी मुंबई मेट्रो लाइन 3 च्या संपूर्ण मार्गावर त्यांचे 4G नेटवर्क जोडले आहे.

मेट्रो 3 लाईनवर Airtel पुरवणार पहिली 5G कनेक्टिव्हिटी सेवा
SHARES

नव्याने उदघाटन झालेल्या मुंबई मेट्रो (mumbai metro) लाईन 3 ज्याला Aqua Line असेही म्हणतात. या मुंबई मेट्रो लाईन 3 (metro 3) च्या 10 स्थानकांवर 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटी (connectivity) जोडणार आहे. Bharti Airtel कंपनी ही सेवा प्रदान करणार आहे. ही सेवा प्रदान करणारी ही पहिली दूरसंचार सेवा कंपनी बनली आहे. 

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते आरे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) या लाईनवर ही भूमिगत पायाभूत सुविधा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Bharti Airtel मुंबईचे सीईओ, आदित्य कांकरिया यांनी Aqua लाईनसह पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये कंपनीच्या गुंतवणुकीवर भर दिला आहे. सार्वजनिक परिवहन वापरकर्त्यांसाठी हाय-स्पीड मोबाइल कनेक्टिव्हिटी अधिक सोयिस्कर आणि फायद्याचे ठरणार आहे.

प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान जलद मोबाइल इंटरनेट, क्रिस्टल-क्लिअर व्हॉईस कॉल्स आणि अखंडित डेटा ट्रान्समिशनचा आनंद घेता येईल.

यापूर्वी, प्रतिस्पर्धी टेल्को व्होडाफोन आयडिया (Vi) ने सांगितले होते की, त्यांनी मुंबई मेट्रो लाइन 3 च्या संपूर्ण मार्गावर त्यांचे 4G नेटवर्क जोडले आहे.



हेही वाचा

लाडकी बहीण योजनेवरून बँक कर्मचारी नाराज

हितेंद्र ठाकूर वसईतून लढणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा