Advertisement

१ डिसेंबरपासून मोबाइल इंटरनेट महागणार

१ डिसेंबरपासून मोबाइल वापरणाऱ्यांना डाटा पॅकसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. देशातील सर्वच दूरसंचार कंपन्या मोबाइल इंटरनेट सेवा महाग करणार आहेत.

१ डिसेंबरपासून मोबाइल इंटरनेट महागणार
SHARES

१ डिसेंबरपासून मोबाइल वापरणाऱ्यांना डाटा पॅकसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. देशातील सर्वच दूरसंचार कंपन्या मोबाइल इंटरनेट सेवा महाग करणार आहेत. एअरटेल, व्होडाफोन -आयडिया, जिओ, बीएसएनएल या कंपन्यांनी मोबाइल डाटाचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील इंटरनेट वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांना याचा फटका बसणार आहे. 

नुकतंच सुप्रीम कोर्टाने एका जुन्या प्रकरणावर सुनावणी करताना दूरसंचार कंपन्यांना ९० हजार कोटी रुपये सरकारला देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या कंपन्यांना मोठा भुर्दंड बसणार आहे. तर एअरटेल,  व्होडाफोन -आयडिया या कंपन्यांना चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १० अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. या कारणांमुळे कंपन्या आपले इंटरनेटचे दर वाढवणार आहेत. भारतात चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या तुलनेत सर्वात स्वस्त मोबाइल डेटा मिळतो.  याबाबत व्होडाफोनने नुकतंच म्हटलं आहे की, भारतात मोठी मागणी असूनही सर्वात स्वस्त मोबाइल डेटा मिळत आहे. व्होडाफोन - आयडिया  १ डिसेंबरपासून आपले डाटा पॅकचे दर वाढवणार आहे. 

एअरटेलकडूनही डाटा पॅकचे दर वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर जिओ आणि बीएसएनएलनेही इंटरनेट महाग करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर किती असणार याविषयी मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. सर्वच कंपन्या दर वाढवणार असल्याने कोट्यवधी ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. 



हेही वाचा-

१ जानेवारीपासून सोनं खरेदीसाठी होणार 'हा' नियम

आधार केंद्रे आठवडाभर खुली राहणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा