Advertisement

आधार केंद्रे आठवडाभर खुली राहणार

आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार आहेत.

आधार केंद्रे आठवडाभर खुली राहणार
SHARES

आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार आहेत. नागरिकांची गर्दी वाढत असल्याने यूआयडीएआयने आधार केंद्रे सातही दिवस चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यूआयडीएआयनं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. 

याआधी आधार सेवा केंद्रे दर मंगळवारी बंद असायची. मात्र, आधार केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी पाहून यूआयडीएआयने सात दिवस आधार केंद्रे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. पासपोर्ट सेवा केंद्रांच्या धर्तीवर सुरू केलेल्या आधार सेवा केंद्रांवर जाण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेता येते. आधार केंद्रात नव्या आधार कार्डसाठी अर्ज करण्यासह  डेटाबेसमध्ये नावे, पत्ता, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख, लिंग अथवा बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट किंवा आयरिस) आदी माहिती बदलून घेता येते. 

तुम्ही हव्या असलेल्या आधार सेवा केंद्राचं नाव निवडून मोबाइल क्रमांक देऊन अपॉइंटमेंट बुक करू शकता. नव्या आधार कार्डसाठी एनरॉल करत असाल तर, तुमचं नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आदीचा उल्लेख करावा लागेल. जर आधार कार्डवरील माहिती अपडेट करायची असेल तर, अपॉइंटमेंट बुक करताना आधार नंबर द्यावा लागेल. हेही वाचा -

काळ्या पैशात २ हजारांच्या नोटा घटल्या, 'हे' आहे याचं कारण

एसबीआय ग्राहकांना एटीएम सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही, 'इथून'ही काढू शकता पैसे
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा