Advertisement

काळ्या पैशात २ हजारांच्या नोटा घटल्या, 'हे' आहे याचं कारण

प्राप्तिकर विभाग आणि अन्य संस्थांनी जप्त केलेल्या काळ्या पैशांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचं प्रमाण घटल्याचं समोर आलं आहे.

काळ्या पैशात २ हजारांच्या नोटा घटल्या, 'हे' आहे याचं कारण
SHARES

प्राप्तिकर विभाग आणि अन्य संस्थांनी जप्त केलेल्या काळ्या पैशांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचं प्रमाण घटल्याचं समोर आलं आहे. याआधी छाप्यामध्ये अधिक मूल्याच्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडत होत्या. मात्र, काळा पैसा जमा करणाऱ्यांनी २०१६ मधील नोटबंदीचा मोठा धसका घेतल्याचं दिसून येत आहे. अधिक मूल्याची २ हजारांची नोट कधीही बंद होण्याची भिती बेकायदा पैसा जमा करणाऱ्यांना वाटत असल्याचं दिसून येतं आहे. 

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ मध्ये प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये सापडलेल्या २ हजारांच्या नोटांचं प्रमाण ६८ टक्के होतं. हेच प्रमाण २०१८-१९ मध्ये घटल्याचं दिसून येत आहे. या वर्षी टाकलेल्या छाप्यांमध्ये २ हजारांच्या नोटांचं प्रमाण ४३ टक्के आहे. नोटाबंदीनंतर हे सरकार अधिक मूल्याच्या नोटांवर कधीही बंदी आणू शकतं असा धसका काळा पैसा गोळा करणाऱ्यांनी घेतल्याचं दिसतं. रिझर्व्ह बँकेनं या नोटा चलनात आणण्याचं प्रमाण कमी केलं आहे, त्यामुळं २००० च्या नोटांचे प्रमाणही घटलं आहे. 

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर केली. नोटाबंदीपूर्वी छापेमारीत एक हजार, पाचशेच्या नोटा मोठ्या प्रमाणात जप्त केल्या जात होत्या. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेनं २००० च्या नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर छाप्यात २ हजारांच्या नोटा अधिक सापडल्या होत्या. मात्र, २ हजारांची नोट कधीही बंद होऊ शकते अशी भिती असल्यामुळे या नोटा बाळगणं कमी झालं. मागील तीन आर्थिक वर्षांत छापेमारीत सापडणाऱ्या दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण ६७.९ टक्क्यांवरून ४३.२ टक्क्यांवर आलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली आहे. हेही वाचा -

PMC घोटाळा : वैद्यकीय उपचारासाठी काढता येणार १ लाख रुपये

BSNL देणार ७ रुपयात १ जीबी डेटा
संबंधित विषय
Advertisement