BSNL देणार ७ रुपयात १ जीबी डेटा

बीएसएनएलचा सगळ्यात स्वस्त प्लान ७ रुपयांपासून सुरू होतो. मिनी-७ असं या योजनेचं नाव आहे.

SHARE

 इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आता कंबर कसली आहे. बीएसएनएल आकर्षक आणि अनेक प्रकारचे फायदे देणाऱ्या योजना आणत आहे. आता बीएसएनएलने ७ रुपयांचा डेटा पॅक आणला आहे. 

बीएसएनएलचा सगळ्यात स्वस्त प्लान ७ रुपयांपासून सुरू होतो. मिनी-७ असं या योजनेचं नाव आहे. एक दिवसांची व्हॅलिटीडी असणाऱ्या या पॅकमध्ये १ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. तसंच मिनी-१६ या डेटा पॅकमध्ये  कंपनी एक दिवसाच्या व्हॅलिटीडीसह २ जीबी डेटा देणार आहे. या डेटा व्हाउचरचं नाव C-DATA56 आहे. या वाउचरनं रिचार्ज केल्यास ७ दिवसांच्या व्हॅलिटीडीसह रोज १.५ जीबी डेटा मिळतो.

DATATsunami_98 हा प्लानही कंपनीने आणला आहे. यामध्ये २४ दिवसांच्या व्हॅलिटीडीसह २ जीबी डेटा मिळत आङे.  या प्लानचं वैशिष्ट्य म्हणजे यात ग्राहकांना इरोस नाउचं सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. तर DATASTV_197 या प्लानसमध्ये युजर्सना रिंग बॅक टोनसोबत २ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिटिडी ५४ दिवसांची आहे.हेही वाचा  -

BSNL च्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा व्हीआरएससाठी अर्ज

PMC बँकेवर प्रशासकाची नियुक्ती, ठेवीदारांची हायकोर्टाबाहेर निदर्शने
संबंधित विषय
ताज्या बातम्या