BSNL च्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा व्हीआरएससाठी अर्ज

बीएसएनएलच्या एकूण १.५०लाख कर्मचाऱ्यांपैकी १ लाख कर्मचारी व्हीआरएस घेण्यास पात्र आहेत.

SHARE

सरकारी कंपनी बीएसएनएल (BSNL) च्या ७७ हजार कर्मचाऱ्यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती (व्हीआरएस) साठी अर्ज केला आहे. कंपनीने व्हीआरएस योजना ५ नोव्हेंबर रोजी सुरू केली आहे.  ही योजना ३ डिसेंबरपर्यंत लागू राहील. १५ दिवसात व्हीआरएससाठी कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एमटीएनएलनेही व्हीआरएस योजना जाहीर केली आहे. 

बीएसएनएलच्या एकूण १.५०लाख कर्मचाऱ्यांपैकी १ लाख कर्मचारी व्हीआरएस घेण्यास पात्र आहेत. ७० ते ८० हजार कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतल्यास पगारामध्ये ७  हजार कोटी रुपये वाचतील अशी कंपनीला अपेक्षा आहे. ५० वर्षांवरील सर्व कर्मचारी या योजनेत अर्ज करू शकतात. स्वेच्छानिवृत्ती ३१ जानेवारी २०२० पासून लागू होईल, अशी माहिती बीएसएनएलकडून देण्यात आली आहे. 

या योजनेस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईत सेवा पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षासाठी ३५ दिवसांचा पगार आणि सेवानिवृत्तीच्या उर्वरित प्रत्येक वर्षासाठी २५ दिवसांचा पगार जोडला जाणार आहे. एमटीएनएलची योजना व्हीआरएसच्या गुजरात मॉडेलवर आधारित आहे.हेही वाचा -

वोडाफोन आयडिया ग्राहकांनो 'या' तारखेपासून वाढणार दर

HDFC कडून ठेवींवरील व्याजदरात 'इतकी' कपात
संबंधित विषय
ताज्या बातम्या