HDFC कडून ठेवींवरील व्याजदरात 'इतकी' कपात

एचडीएफसी बँकेने आपल्या ठेवींवर (फिक्स्ड डिपॉझिट) व्याजदरात मोठी कपात करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

SHARE

एचडीएफसी बँकेने आपल्या ठेवींवर (फिक्स्ड डिपॉझिट) व्याजदरात मोठी कपात करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.  बँकेने १ वर्ष मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ०.१५ टक्के कमी केला आहे. या मुदत ठेवींवर आता ६.३० टक्के व्याज मिळणार आहे. तर एचडीएफसीने १ ते २ वर्ष मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरही ०.१५ टक्क्याने घटवला आहे. नवीन दर १६ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

एचडीएफसी बँकेकडून आता ७ ते १४ दिवसांच्या मुदत ठेवीवर ३.५० टक्के तर १५-२९ दिवसांच्या मुदत ठेवीवर ४ टक्के, ३०-४५ दिवसांच्या मुदत ठेवीवर ४.९० टक्के, ४६ दिवस ते ६ महिन्यांच्या मुदत ठेवीवर ५.४० टक्के व्याज देण्यात येणार आहे. ६ महिने ते ९ महिन्यांच्या आणि ९ महिने ते १ वर्षांच्या मुदत ठेवींवर एचडीएफसीकडून अनुक्रमे ५.८० टक्के आणि ६.०५ टक्के व्याज मिळणार आहे.

 २ ते ५ वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदरातही बँकेने ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. या ठेवींवर आता ६.४० टक्के व्याज मिळेल. तर ३ वर्षे दिवस ते ५ वर्षे कालावधी असलेल्या ठेवींवर ६.३० टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य ग्राहकांच्या तुलनेत ०.५० टक्के अधिक व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या  मुदत ठेवींवर ४ टक्के ते ६.९० टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.हेही वाचा -

INCOME TAX लवकरच क्रेडिट कार्ड, मोबाइल वॉलेटने भरता येणार

SIP तून घ्या शेअर बाजाराचा फायदा
संबंधित विषय
ताज्या बातम्या