वोडाफोन आयडिया ग्राहकांनो 'या' तारखेपासून वाढणार दर

वोडाफोन आयडियानं गेल्या आठवड्यात आपल्याला ५० हजार ९२१ कोटींचा तोटा झाल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे दर वाढवत असल्याची शक्यता आहे.

SHARE

वोडाफोन आयडियाचं कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. लवकरच वोडाफोन आयडियाचे दर वाढणार आहेत. या दरात १ डिसेंबरपासून बदल होतील, असं कंपनीनं म्हटलं आहे. मोबाइल डाटाच्या सेवेला मोठी मागणी असली तरी भारतात मोबाइल डाटाचे दर जगभरात सगळ्यात स्वस्त आहेत. १ डिसेंबरपासून या दरात वाढ केली जाईल, असंही या कंपनीनं म्हटलं आहे.

ग्राहकांच्या खिशाला कात्री

टेलिकॉम क्षेत्र आर्थिक संकटात आहे आणि असं असतानाही मोबाइल डाटा स्वस्त असल्यानं आम्हाला दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय, असं वोडाफोन आयडियानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मोबाइल कॉल्स आणि डाटाचे किमान दर ठरवण्यासाठी सचिवांची एक समिती स्थापन करण्यात येईल, असं त्यात म्हटलं होतं. या समितीनं टेलिकॉम खात्याकडून याबद्दल सूचना मागवल्या होत्या.

वोडाफोन तोट्यात

वोडाफोन आयडियानं गेल्या आठवड्यात आपल्याला ५० हजार ९२१ कोटींचा तोटा झाल्याचं म्हटलं होतं. यावर्षी सप्टेंबर महिन्यात संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतचा सगळ्यात तोटा झाल्याचं कंपनीचं म्हणणं होतं.

यामुळे वोडाफोन कंपनीवर ताण

सरकारकडून एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू म्हणजेच AGR वसूल केला जातोय. यामुळे वोडाफोन आयडियावर प्रचंड ताण पडतोय. सुप्रीम कोर्टानं २४ ऑक्टोबर रोजी AGR संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. यात दूरसंचार कंपन्यांकडून ९४ हजार करोड रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. यात व्याज आणि दंड पकडून ही रक्कम १.३ लाख करोड होतेय

दरम्यान वोडाफोन कधीही भारतातून आपला गाशा गुंडाळी शकते अशा बातम्या येत आहेत. पण अजूनपर्यंत कंपनीकडून या संदर्भात कुठलीच माहिती देण्यात आली नाही.हेही वाचा

HDFC कडून ठेवींवरील व्याजदरात 'इतकी' कपात

INCOME TAX लवकरच क्रेडिट कार्ड, मोबाइल वॉलेटने भरता येणार


संबंधित विषय
ताज्या बातम्या