Advertisement

कंपनीचं मुख्यालय विकून अनिल अंबानी फेडणार कर्ज?

हजारो कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबलेले रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि उद्योगपती अनिल अंबानी आपलं सांताक्रूझ येथील मुख्यालय विकण्याच्या तयारीत आहेत.

कंपनीचं मुख्यालय विकून अनिल अंबानी फेडणार कर्ज?
SHARES

हजारो कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबलेले रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि उद्योगपती अनिल अंबानी आपलं सांताक्रूझ येथील मुख्यालय विकण्याच्या तयारीत आहेत. या मुख्यालयाची विक्री झाल्यास अंबानी पुन्हा आपल्या जुन्या कार्यालयात स्थलांतरीत होतील, असं म्हटलं जात आहे.

किती कर्ज?

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपमधील बहुतेक व्यवसाय तोट्यात आहेत. त्यामुळे रिलायन्स ग्रुपवर १ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज झालं आहे. मार्च २०१८ च्या आकडेवारीनुसार रिलायन्स कॅपिटलवर ४६ हजार ४०० केटी, ऑरकॉमवर ४७ हजार २३४ कोटी, रिलायन्स होम फायनान्स आणि इन्फ्रावर ३६ हजार कोटी आणि रिलायन्स पॉवरवर ३१ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. 

किती जागा?

हे कर्ज फेडण्यात सातत्याने अपयश येत असल्याने अखेर त्यांनी आपली मालमत्ता विकून पैसे गोळा करण्याचं ठरवलं आहे. मुंबईतील सांताक्रूझमध्ये रिलायन्स ग्रुपचं ‘रिलायन्स सेंटर’ हे मुख्यालय आहे. हे मुख्यालय विकून किंवा दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्वावर देण्याचा त्यांचा विचार आहे. रिलायन्स सेंटर ७ लाख चौरस फुटांचं असून त्याचं बाजारमूल्य १५०० ते २००० कोटी रुपये आहे. या मुख्यालयासह रियल इस्टेट अॅसेट्स विकण्याचाही कंपनीचा विचार सुरू आहे. त्यानंतर अंबानी बॅलार्ड-पिअर इस्टेटमधील जुन्या मुख्यालयातूनच सगळी सूत्रं हलवतील.

जागेचा वाद 

सध्या या मुख्यालयाच्या मालकीवरून सध्या वाद सुरू आहेत. रिलायन्सकडून वीज निर्मिती आणि वितरणाचे हक्क विकत घेणाऱ्या अदानींनी या मुख्यालयाच्या जमिनीवर दावा केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं ही जमीन विकणं किंवा भाडेतत्वावर देणं अंबानींना अवघड जाणार आहे. यासंदर्भात ते तज्ज्ञांचा सल्लाही घेत आहेत.  



हेही वाचा-

प्रसिद्ध गोदरेज कुटुंबात कलह, संपत्तीची होणार वाटणी

अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला मिळालं वर्सोवा-वांद्रे सी लिंकचं कंत्राट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा