Advertisement

‘Hello Mumbai’ टॅगलाइनअंतर्गत देशात उभे राहणार Appleचे पहिले स्टोअर

मुंबईत लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे.

‘Hello Mumbai’ टॅगलाइनअंतर्गत देशात उभे राहणार Appleचे पहिले स्टोअर
SHARES

Apple चे भारतातील पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मुंबईत सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन लवकरच होणार आहे. मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत.

याशिवाय अ‍ॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अ‍ॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या जातील. स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अ‍ॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात येणार आहे.

Apple च्या पहिल्या स्टोअरचा अनुभव वापरकर्ते Apple BKC वॉलपेपर डाउनलोड करून घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला स्पेशल साउंड आणि Apple म्युझिकची प्ले-लिस्ट मिळणार आहे.

भारतीय बाजारपेठेमध्ये Apple कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे. पुढील माहिन्यात हे पहिले फ्लॅगशिप स्टोअर मुंबईमध्ये उघडण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरे फ्लॅगशिप रिटेल स्टोअर हे राजधानी दिल्ली मध्ये उभारले जाणार आहे.

भारतामध्ये सध्या Apple चे फक्त ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे. इतर स्टोअर्स हे कंपनीचे अधिकृत स्टोअर्स आहेत. Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. 

Apple ची पुरवठादार Foxconn कंपनीला एअरपॉड्स तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. फॉक्सकॉन हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ७०% आयफोन बनवतो. आता कंपनीला प्रथमच एअरपॉडचे कंत्राट मिळाले आहे. फॉक्सकॉन ही कंपनी या निमित्ताने भारतामध्ये $२०० दशलक्ष म्हणजेच सुमारे १,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.



हेही वाचा

लवकरच सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन नियम जाहीर केले जातील

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा