Advertisement

कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार 300 लाख कोटींचा फटका

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ३०० लाख कोटी रुपयांचं (४ लाख कोटी डॉलर) नुकसान होण्याची शक्यता आशियाई विकास बँके (एडीबी) ने वर्तवली आहे.

कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार 300 लाख कोटींचा फटका
SHARES

कोरोनामुळे अनेक देशांमध्ये लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ३०० लाख कोटी रुपयांचं (४ लाख कोटी डॉलर) नुकसान होण्याची शक्यता आशियाई विकास बँके (एडीबी) ने वर्तवली आहे. आशियाई विकास बँकेने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भारताचा आर्थिक वृद्धी दर घटून ४ टक्के राहील, असा अंदाजही व्यक्त केला आहे. 

एडीबीने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, कोरोना ही या शतकातील सर्वात मोठी महामारी आहे. कोरोनामुळे जागतिक वृद्धीवर परिणाम झाला आहे आणि भारतही यापासून वेगळा नाही. असे असले तरी भारताचा व्यापक आर्थिक पाया बळकट आहे आणि येत्या वित्त वर्षादरम्यान अर्थव्यवस्थेत जोरदार सुधारणा होण्याची आशा आहे. एडीबीने एशियन डेव्हलपमेंट आऊटलूक २०२० मध्ये सांगितले की, भारताचा जीडीपी वृद्धी दर येत्या वित्त वर्षात ६.२ टक्क्यांवर पोहोचू शकतो.

एडीबीने या वर्षी आशियाच्या विकासाचा अंदाज २.२ टक्के व्यक्त केला. हा विकास दर १९९८ च्या आशियाई वित्तीय संकटानंतर प्रथमच एवढा मंद असेल, त्यावेळी विकास दर १.७ होता. चीनचा विकास दर या वर्षी २.३ टक्क्यांपर्यंत घटू शकतो. हा २०१९ मध्ये ६.१ टक्के होता. इंटरनॅशनल लेबर आॅर्गनायझेशन (आयएलओ) च्या अहवालानुसार, कोरोनामुळे या वर्षी जागतिक मनुष्यबळाला ७० लाख कोटी रुपयांपासून २५० लाख कोटी रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकते.  हे वर्ष २००७-०९च्या मंदीपेक्षाही मंदीचा वाईट काळ ठरू शकतो. या संकटामुळे या वर्षी २.५ कोटी नागरिक आपली नोकरी गमावू शकतात. २०२० मध्ये जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनात जवळपास २ टक्क्यांची घट येईल. त्यामुळे जागतिक बेरोजगारी वाढेल. पत मानांकन संस्था फिच रेटिंग्जने भारताच्या वृद्धी दराच्या अंदाजात घट करून २ टक्के केला आहे. हा ३० वर्षांतील किमान स्तर असेल. याआधी अंदाज घटवून ५.१ टक्के केला होता. 



हेही वाचा -

2 महिन्यांत मुकेश अंबानींच्या संपत्तीत 'इतकी' घट

लॉकडाऊनमुळं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, काॅल करा 'ह्या' क्रमांकावर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा