मुंबईत ATM सुरु, 31 डिसेंबरपर्यंत शुल्क नाही

  Pali Hill
  मुंबईत ATM सुरु, 31 डिसेंबरपर्यंत शुल्क नाही
  मुंबई  -  

  मुंबई - देशभरात आजपासून एटीएम सुरु झालेत. तसंच एटीएममध्ये 500 आणि 2000 च्या नोटा आजपासून उपलब्ध झाल्या आहेत. एटीएममधून 18 नोव्हेंबरपर्यंत 2000 रुपये काढू शकता येणार आहेत. त्यानंतर काही दिवसांनी 4000 रुपये एटीएममधून काढता येतील. गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील सर्वच एटीएम बंद ठेवण्यात आले होते. तसंच अनेक एटीएममध्ये अजूनही पैसे टाकण्याचं काम सुरु आहे. तसंच पूर्णपणे एटीएमची सेवा सुरु होण्याकरता अजून काही दिवस लागतील असं आरबीआयकडून सांगण्यात आलंय. तर आणखी महत्त्वाची बाब म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत एटीएममधून पैसे काढण्यासाठी कुठलंही शुल्क लावलं जाणार नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.