Advertisement

मार्च महिन्यात ११ दिवस बंद राहणार बॅंका

फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघे काही शिल्लक असताना मार्चमधील सुट्ट्यांची यादी जाहिर झाली आहे.

मार्च महिन्यात ११ दिवस बंद राहणार बॅंका
SHARES

फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघे काही शिल्लक असताना मार्चमधील सुट्ट्यांची यादी जाहिर झाली आहे. त्यामुळं मार्चमध्ये जर तुमची बँकेसंदर्भातील महत्वाची कामं करायची असल्यास लवकरचं आटपून घ्या. कारण मार्चमध्ये ११ दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. या सुट्ट्याचं वेळापत्रक प्रत्येक राज्याप्रमाणं वेगळे आहे. त्यामुळं नागरिकांनी बँकेचे काम करण्यासाठी घराबाहेर पडता कॅलेंडर पाहून बाहेर पडावं. मुंबईसह महाराष्ट्रात ९ दिवस बँकांचे काम बंद असणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण ११ दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. यापैकी ५ मार्च, ११ मार्च, २२ मार्च, २९ मार्च आणि ३० मार्च रोजी बँकांना सुट्टी असणार आहे. त्याशिवाय, ४ रविवार आणि २ शनिवारीही बँका बंद राहणार आहेत. मार्चमध्ये एकूण ११ दिवस बँकांमध्ये काम पूर्ण बंद राहणार आहे.

बँकांना असलेल्या सुट्ट्या

  • ५ मार्च, शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुट्टी
  • ७ मार्च, रविवार
  • ११ मार्च, गुरुवार, महाशिवरात्री
  • १३ मार्च, दुसरा शनिवार
  • १४ मार्च, रविवार
  • २१ मार्च, रविवार
  • २२ मार्च, सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुटी
  • २७ मार्च, चौथा शनिवार
  • २८ मार्च, रविवार, होळी
  • २९ मार्च, सोमवार, धूलिवंदन
  • ३० मार्च, मंगळवार, राजस्थान दिवस

यामधील ७ मार्च रविवार, ११ मार्च गुरुवार महाशिवरात्री, १३ मार्च दुसरा शनिवार, १४ मार्च रविवार, २१ मार्च रविवार, २७ मार्च चौथा शनिवार, २८ मार्च रविवार होळी, २९ मार्च सोमवार धूलिवंदन अशा एकूण ९ दिवस राज्यात बँका बंद राहणार आहे. त्यामुळं मार्चमधील कामे पटापट आटपून घ्या.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा