Advertisement

'ह्या' बँका आकारणार मिनिमम बॅलन्सवर शुल्क

३ मोफत ट्रान्झॅक्शननंतर देखील बँकांकडून शुल्क आकारण्यात येणार आहे.

'ह्या' बँका आकारणार मिनिमम बॅलन्सवर शुल्क
SHARES

बँक ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेने १ ऑगस्टपासून ग्राहकांच्या खात्यातील मिनिमम बॅलन्सवर शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. याशिवाय एटीएममधून ३ मोफत ट्रान्झॅक्शननंतर देखील बँकांकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्राच्या खातेधारकांना त्यांच्या खात्यामध्ये आता कमीतकमी २ हजार रुपये शिल्लक ठेवावी लागेल. याआधी ही शिल्लक रक्कम १५०० रुपये होती. खात्यावर २ हजार रुपयांपेक्षा कमी शिल्लक असल्यास मेट्रो आणि शहरी भागात ७५ रुपये, निमशहरी भागात ५० रुपये आणि ग्रामीण क्षेत्रात २० रुपये प्रति महिना शुल्क आकारण्यात येणार आहे. तसंच एका महिन्यात ३ मोफत व्यवहारानंतर पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. बँकेने लॉकरसाठी जमा रक्कम कमी केली आहे मात्र लॉकरवर पेनल्टी वाढवण्यात आली आहे. 

अ‍ॅक्सिस बँकेच्या खातेधारकांना आता प्रत्येक ईसीएस व्यवहारावर २५ रुपये शुल्क आकारण्यात आलं आहे. याआधी  ईसीएस व्यवहारासाठी शुल्क नव्हते. कोटक महिंद्रा बँकेच्या बचत आणि कॉर्पोरेट खातेधारकांना एटीएममधून महिन्यातून ५ पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये शुल्क द्यावे लागेल. जर तुमच्या खात्यामध्ये शिल्लक कमी असल्यामुळे व्यवहार फेल झाला तरी २५ रुपये शुल्क आकारण्यात येईल.



हेही वाचा

Exclusive खळबळजनक! विलगीकरणातून कोरोनाची लक्षणे असलेल्या आरोपींचे पलायन

दिवसभरात ५५२७ जणांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा