बँकेशी संबंधित कामं लवकर करून घ्या. कारण चालू महिन्यात बँका तब्बल ९ दिवस बंद असणार आहेत. वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. वर्षाखेरीस तुम्हाला कॅशची कमतरता जाणवू नये म्हणून संबंधित असलेली सर्व कामं तात्काळ उरकून घ्या. बँकेला सुट्टी असल्यामुळे एटीएम मशीनमध्येही कॅशची समस्या उद्भवू शकते.
१) डिसेंबर महिन्यात म्हणजेच चालू महिन्यात ५ रविवार आहेत. त्यामुळे बँका १ डिसेंबर, ८, १५ आणि २२ डिसेंबर बंद असणार आहे.
२) १४ डिसेंबरला दुसरा तर २८ डिसेंबरला चौथा शनिवार आहे. त्यामुळे या दिवशी बँका बंद असतील.
३) २५ डिसंबर ख्रिसमसची सुट्टी आहे. त्यामुळे या दिवशी देखील बँक बंद असतील.
४) बँकेच्या सुट्ट्या जाणून घेण्यासाठी तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला देखील भेट देऊ शकता.
२०२० च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँक हॉलिडेची कोणतीच सुट्टी मिळणार नाही आहे. २६ जानेवारीला रविवार आल्यानं बँक ग्राहकांची एक सुट्टी वाया जाणार आहे. या व्यतिरिक्त एकही बँक हॉलिडे जानेवारी महिन्यात नसणार आहे.
जानेवारी महिन्यात चार शनिवार आहेत. त्यामुळे दुसरा आणि चौथ्या शनिवारी कर्मचाऱ्यांना आपली हक्काची सुट्टी मिळेल. त्यामुळे डिसेंबर महिन्यात रखडलेली बँकेची काम तुम्ही जानेवारी महिन्यातही करू शकता.
हेही वाचा