जीएसटीपासून मिळाला 'इतक्या' लाख कोटींचा महसूल

अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर जीएसटी संकलन वाढल्याने केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

SHARE

अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. वस्तू व सेवा करापासून (जीएसटी) केंद्र सरकारला नोव्हेंबरमध्ये १ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 

अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात सरकारला १ लाख ३ हजार ४९२ कोटी रुपये जीएसटी मिळाला.  ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत ८ हजार कोटी रुपयांनी अधिक हा आकडा आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन ९५ हजार ३८० कोटी रुपये होते. नोव्हेंबरमधील जीएसटी संकलनात केंद्राचा जीएसटी १९,५९२ कोटी रुपये, तर राज्याचा २७,१४४ कोटी रुपये होता. एकात्मिक जीएसटी संकलन ४९,०२८ कोटी रुपये राहिला आहे. त्यात आयातीवरचा जीएसटी २०,९४८ कोटी रुपये तर उपकर ७,७२७ कोटी रुपये होता.

नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन १ लाख कोटींच्या पुढे गेले आहे हा सरकारसाठी दिलासा मानला जात आहे. जीएसटी संकलन सलग तीन महिन्यांपासून एक लाख कोटी रुपयांच्या खाली राहिले आहे. ऑगस्टमध्ये ९८.२०२ कोटी रुपये, ऑक्टोबरमध्ये ९५,३८० कोटी रुपये आणि सप्टेंबरमध्ये ९१,९१६ कोटी रुपयांचा जीएसटी मिळाला होता. हेही वाचा -

बँकिंग क्षेत्राला उभारी देण्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन

रिलायन्स इंडस्ट्रीजने रचला 'हा' नवा इतिहाससंबंधित विषय
ताज्या बातम्या