मोदी सरकारनं बँकिंग क्षेत्राला उभारी देण्यासाठी एक खास प्लॅन आखला आहे. स्ट्रेस अॅसेट फंड (NPA) असं याचं नाव आहे. बँकांचं NPA म्हणजेच बुडीतल्या मालमत्ता खरेदी करून आणि स्ट्रेस अॅसेट विकून पैसे आणण्याचा या योजनेचा उद्देश आहे. यामुळे बँकांना कर्ज देणं आणखी सोपं होईल.
स्ट्रेस अॅसेट फंडसाठी पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांच्यात चर्चा झालीय. आर्थिक मंदीतून देशाला सावरण्यासाठी बँकिंग क्षेत्राला दिलासा देण्याची गरज आहे. त्यासाठीच सरकार एकेक योजना आणतंय. स्ट्रेस अॅसेट फंड हा त्याचाच भाग आहे.
२०२० च्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत ४४ बँकांचे एकूण NPA ९.२७ लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त होता. मार्च २०१४ मध्ये तो २.४१ कोटी रुपये होता. बँकिंग क्षेत्रासाठी ही संकटाची स्थिती होती.
हेही वाचा