हौस मारून जमवलेला पैसाही बाहेर पडला

 Goregaon
हौस मारून जमवलेला पैसाही बाहेर पडला

गोरेगाव - सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा अचानक बंद केल्यानं घर खर्चातून काटकसरीने हौस मारून वाचवलेली पै-पै बाहेर काढण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.

सध्या बँकेत खुप गर्दी असल्यामुळे काही महिलांनी पैशांची बचत करण्यासाठी पिगी बँकेत जमा केलेले दहा आणि पन्नासच्या नोटा काढून घर खर्च चालवत आहेत. तर त्यातील पाचशे आणि हजारांच्या नोटा एकत्र करून पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत जमा केलेली पुंजी उघड करून बँकेत भरत आहेत.

येणाऱ्या पाहुण्यांकडून मुलांना मिळणारे पैसे या पिगी बँकेत जमा केले होते. पण या पिगी बँकेत चिल्लर, दहा, वीस, पाचशे आणि हजारांच्या नोटांचा समावेश असल्यानं या अडचणींच्या दिवसात पिगी बँकची खुप मदत झाली असं माया कदम यांनी सांगितलं.

Loading Comments