बारमध्ये अनोळखी चेहरे


SHARE

मुंबई - नोटबंदीच्या घोषणेनंतर अनोळखी चेहरेच लेडीज डान्सबारमध्ये जास्त दिसू लागले आहेत, त्यांच्याकडून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बिलासाठी किंवा टिप म्हणून दिल्या जातात. मात्र अशा नोटा स्वीकारण्यास आम्ही नकार देतोय, असे मुंबई हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण अग्रवाल यांनी सांगितले.

नोटबंदीच्या आदेशानंतर लेडीज बारमध्येही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा घेतल्या जात नाहीत. त्यामुळे जुन्या नोटा किंवा काळा पैसा कसा खपवावा असा प्रश्न उभा राहिला आहे.
याबाबत मुंबई हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही या नोटा स्वीकारत नसल्याची माहिती दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या