Advertisement

विमा घेण्यापूर्वी कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो नक्कीच पहा

आपण जीवन विमा घेत असाल तर आपण ज्या कंपनीकडून पॉलिसी घेत आहात त्या कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो निश्चितपणे तपासा. सेटलमेंट रेशो अधिक असणे खूप महत्वाचे आहे.

विमा घेण्यापूर्वी कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो नक्कीच पहा
SHARES

विमा पॉलिसी घेण्याआधी सर्व अटी व शर्ती, त्यात काय अंतर्भूत आहे, काय नाही आणि कोणते फायदे विशिष्ट कालावधीनंतर मिळतील ते नीट समजून  घ्यावे. हे मेडिक्लेम पॉलिसीलाही खास करून लागू आहे. अर्ज शक्यतो स्वत: भरून मगच त्यावर सही करावी. विमा पॉलिसी नेहमी स्वत:च्या पत्त्यावर मागवून घ्यावी आणि ती आल्यावर लगेच वाचून काढावी. नावाच्या स्पेलिंगपासून सगळे पहावे.

पॉलिसीत दिलेल्या अटी व शर्ती नामंजूर असल्यास  पॉलिसी मिळाल्यापासून १५ दिवसात ती परत करता येते. मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक हप्त्यांपेक्षा वार्षिक हप्ता स्वस्त पडतो. त्यामुळे शक्यतो तोच पर्याय स्वीकारावा.

आपण जीवन विमा घेत असाल तर आपण ज्या कंपनीकडून पॉलिसी घेत आहात त्या कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो निश्चितपणे तपासा. सेटलमेंट रेशो अधिक असणे खूप महत्वाचे आहे. उच्च सेटलमेंट रेशो म्हणजे विमा कंपनीने अधिक दावे निकाली काढले आहेत हे दर्शविते. जीवन विमा कंपन्या त्यांच्या वार्षिक अहवालात क्लेम सेटलमेंट रेशो देतात. आम्ही आपल्याला क्लेम सेटलमेंट रेशो बद्दल सांगणार आहोत.

क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे काय?

क्लेम सेटलमेंट रेशो आर्थिक वर्षात जीवन विमा कंपनीने ठरविलेला किंवा दिला जाणारा एकूण मृत्यू दावा दर्शवितो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या जीवन विमा कंपनीचे १००० मृत्यूचे दावे आहेत आणि त्यापैकी कंपनीने ९२४ दावे निकाली काढले आहेत. तर त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो ९२.४ टक्के आणि क्लेम रिजेक्शन रेट ७.६ टक्के असेल.

योग्य सेटलमेंट रेशो आवश्यक

 विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो तपासा. क्लेम सेटलमेंट रेशो सर्वात चांगला आहे अशी विमा कंपनी निवडा. योग्य विमा कंपनी निवडण्यात मदत करण्यासाठी विमा नियामक दरवर्षी क्लेम सेटलमेंट रेशो डेटा जाहीर करतात. ९० टक्क्यांहून अधिक क्लेम सेटलमेंट रेशो असणारी विमा कंपनी नेहमी निवडा.

योग्य माहिती देणं महत्वाचं 

विमा कंपन्यांचं म्हणणं आहे की, पॉलिसीधारकांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे क्लेम सेटलमेंट करण्यात अडचणल येते. बहुतांशी लोक पॉलिसी विमा एजंटकडून खरेदी करतात. विमा एजंट पॉलिसी पेपर्समध्ये चुकीचा माहिती भरतात. त्यामुळे पॉलिसी धारकाने पॉलिसी कागदपत्रे स्वतःच भरावेत. पॉलिसी घेताना योग्य माहितीदिली गेली असेल तर क्लेम सेटलमेंट करणे सोपे जाते. 

आयआरडीए वेबसाइटवर माहिती

पॉलिसी घेण्यापूर्वी आयआरडीएच्या वेबसाइटवर जा आणि त्या विमा कंपनीबद्दल माहिती मिळवा. ज्या कंपनीच्या क्लेम सेटलमेंट रेशो ९० टक्क्यांहून कमी असतील अशा कंपनीकडून कधीही पॉलिसी घेऊ नका. विमा कंपन्यांचा फक्त क्लेम सेटलमेंट रेशो नाही तर पेंडींग क्लेम रेशोही पहायला हवा.



हेही वाचा -

पैसे पाठवताना चुकून दुसर्‍याच्या खात्यात गेले, तर काय करावे? जाणून घ्या

ज्येष्ठ नागरिकांना कर बचत एफडीवर 'या' बँका देत आहेत 'इतकं' व्याज


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा