Advertisement

सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची वाढ, जाणून 'घ्या' नवे दर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला आहे.

सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची वाढ, जाणून 'घ्या' नवे दर
SHARES

महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यवसायीकांना महागाईचा फटका बसला आहे. सिलिंडरच्या किमती १०० रुपयांनी वाढल्या आहेत. घरगुती सिलिडंरचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र व्यवसायिक सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

सिलिंडरच्या नव्या दरानुसार आता मुंबईत १९ किलो व्यवसायिक सिलिंडरची किंमत २०५० रुपये झाली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास २५० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. आज पुन्हा एकदा सिलिंडर १०० रुपयांनी महागले आहे.

दिलासादायक म्हणजे घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे.

व्यवसायिक सिलिंडर महागल्यानं हॉटेलमधील जेवणाचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. जेवणाच्या प्रत्येक डिलिव्हरीमागे ग्राहकांना १५ ते २० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. एलपीजी सिलेंडरचे दर कमी करावे की त्यात वाढ करावी याबाबत या आढाव्यात निर्णय घेतला जातो.

प्रत्येक कंपनीकडून बैठकीनंतर दर महिन्याच्या एक तारखेला व्यावसायिक आणि एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातात. काही वेळेस दर कायम ठेवले जातात. पण, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कमर्शिअल सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.



हेही वाचा

Reliance Jioचा रिचार्ज महागला, पहा प्लॅनचे नवे दर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा