Advertisement

Reliance Jioचा रिचार्ज महागला, पहा प्लॅनचे नवे दर

Reliance Jioनं प्रीपेड टॅरिफ प्लॅनचे दर वाढवले आहेत.

Reliance Jioचा रिचार्ज महागला, पहा प्लॅनचे नवे दर
SHARES

Reliance Jioनं प्रीपेड टॅरिफ प्लॅनचे दर वाढवले आहेत. रिलायंस जिओचे नवे दर १ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

'हे' आहेत नवे प्लॅन

  • जिओचा आधीचा सर्वात स्वस्त ७५ रुपयांचा प्लॅन आता ९१ रुपयांना मिळणार आहे. यामध्ये ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सुविधा आणि ५० एसएमएस मिळणार असून याची वैधता २८ दिवसांपर्यंत असणार आहे.
  • १४९ रुपयांच्या अमर्यादित प्लॅनची किंमत १७९ रुपये असेल आणि दररोज १GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस प्रतिदिन देईल.
  • जिओचा १२९ रुपयांना मिळणारा प्लॅन आता १५५ रुपयांना मिळणार आहे. यामध्ये २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सुविधा आणि ३०० एसएमएस मिळतील.
  • २४९ रुपयांचा प्लॅन २९९ रुपयांपर्यंत वाढवला जाईल आणि दररोज २GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि १०० SMS ची सुविधा मिळेल.
  • Jio कडे ५६ दिवसांच्या वैधतेसह दोन प्रीपेड योजना आहेत. ज्यात १.५ GB आणि २GB  डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज १०० SMS मिळतात. रुपये ३९९ आणि रु ४४४ चे प्लॅन अनुक्रमे रु. ४७९ आणि रु ५३३ असे झाले आहेत.
  • जिओचे ८४ दिवसांच्या वैधतेसह तीन प्रीपेड प्लॅन आहेत. ३२९ रुपये, ५५५ रुपये आणि ५९९ रुपये किंमतीचे हे प्लॅन अनुक्रमे ३९५ रुपये, ६६६ रुपये आणि ७१९ रुपये वाढवले जातील. सर्व योजना अमर्यादित कॉल्स आणि 100 एसएमएस प्रतिदिन ऑफर करत आहेत. ते अनुक्रमे ६ GB डेटा, १.५ GB डेटा आणि २ GB दैनिक डेटा देतात.
  • २३९९ रुपये किमतचा प्लॅन आता २८७९ रुपये किंमतीचा असेल. यामध्ये दिवसाला २ जीबी डेटा शिवाय १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध असेल.

जिओनं असा दावा केला आहे की, प्लॅनच्या दरात वाढ करण्यात आली असली तरीही जिओचे प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्याच्या प्लॅनपेक्षा स्वस्त आहेत. दरात वाढ केली असली तरी सर्वात स्वस्त दरात ग्राहकांना उत्तम सेवा पुरवण्याचं काम रिलायंस जिओ करणार आहे.

रिलायन्जिस जिओ कंपनीच्या वतीनं एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये कंपनीनं म्हटलं आहे की, "येत्या काळात प्रत्येक भारतीयाला खऱ्या अर्थानं चांगली डिजिटल सुविधा देण्यासाठी जिओनं आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम इंन्डस्ट्रिजमधील सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी जिओ कटिबद्ध आहे. जिओच्या सर्व ग्राहकांना याचा लाभ मिळेल."

याआधी एयरटेल (Airtel) आणि व्हीआय (VI) ने प्लॅनच्या दरात वाढ केली होती. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत जिओनंही प्रीपेड प्लॅनची किंमत वाढवली आहे.हेही वाचा

पेटीएमचा आयपीओ बाजारात दाखल

सर्वाधिक आत्महत्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा