Advertisement

सर्वाधिक आत्महत्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल

एका सर्वेक्षणानुसार, २०२० मध्ये, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्येच्या घटना उघडकिस आल्या आहेत.

सर्वाधिक आत्महत्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल
(Representational Image)
SHARES

एका सर्वेक्षणानुसार, २०२० मध्ये, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्येच्या घटना उघडकिस आल्या. यामध्ये छोट्या व्यवसायकांचा समावेश अधिक आहे. छोट्या व्यवसायक मालकांमध्ये आत्महत्येच्या मृत्यूचं प्रमाण २५ टक्क्यांनी वाढलं आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार स्वयंरोजगार श्रेणींमध्ये वर्गीकृत विक्रेते, व्यापारी आणि इतर लहान व्यवसाय मालक सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

सलग दुसऱ्या वर्षी, महाराष्ट्र सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक आत्महत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. २०२० साली १९ हजार ९०९ आत्महत्येच्या नोंदी झाल्या आहेत. २०१९ मध्ये हा आकडा १८ हजार ९१६ इतका होता.

महाराष्ट्रात, २०१९ मध्ये १ हजार २८९ च्या तुलनेत २०२० मध्ये अशा १ हजार ६१० स्वयंरोजगार व्यक्तींनी स्वतःचा जीव घेतला, असं NCRB च्या अहवालात नमूद आहे.

स्वयंरोजगार व्यतिरिक्त, राज्यातील शेती क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला. राज्यात २०२० मध्ये ४ हजार ००६ शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या झाल्या होत्या. तर २०१९ मध्ये ३ हजार ९२७ घटना झाल्या होत्या.

एकंदरीत, २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये आत्महत्या ५.२ टक्के आणि ४.३ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

तज्ञांनी सांगितलं की, २०१९ मध्ये ९ हजार ०५२ आणि २०२० मध्ये ११ हजार ७१६ आत्महत्या झाल्या. सरकारनं लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आले. आर्थिक अडचणीत अडकल्यामुळे अनेक जणांनी टोकाचं पाऊल उचललं.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोविड-19 रुग्णांची संख्या ६६ लाख आणि मृतांची संख्या १.४ लाख आहे.

योगायोगानं, इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये एकूण आत्महत्यांची संख्या जास्त आहे.

दरम्यान, NCRB अपघाती मृत्यू आणि आत्महत्या अहवाल २०२० नुसार, २०१९ च्या तुलनेत देशभरात ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.



हेही वाचा

अँटॉप हिल परिसरातील ३ घरं कोसळली, ९ जणांना...

पुनम पांडे रुग्णालयात दाखल, पती खातोय तुरुंगाची हवा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा