Advertisement

आठवड्याभरात सोन्याचे भाव ४५ हजारांवर जाण्याची शक्यता

कोरोना व्हायरसचा संपूर्ण मार्केटवर खोलवर परिणाम झालेला आहे. जागतिक बाजारपेठेत डाॅलरच्या घसरणीचा नकारात्मक परिणामही दिसू लागला आहे. यामुळे भारतीय बाजारात येत्या आठवड्याभरात सोन्याचे दर प्रति तोळा ४५ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे

आठवड्याभरात सोन्याचे भाव ४५ हजारांवर जाण्याची शक्यता
SHARES

कोरोना व्हायरसचा संपूर्ण मार्केटवर खोलवर परिणाम झालेला आहे. जागतिक बाजारपेठेत डाॅलरच्या घसरणीचा नकारात्मक परिणामही दिसू लागला आहे. यामुळे भारतीय बाजारात येत्या आठवड्याभरात सोन्याचे दर प्रति तोळा ४५ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता एंजल ब्रोकिंगने वर्तवली आहे.

८ टक्क्यांनी वाढल्या

या आठवड्यातील कृषीव्यतिरिक्त कमोडिटीजवर प्रकाश टाकताना एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन एग्री कमोडिटीज अँड करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सोन्याच्या किमतीमध्ये वाढीची शक्यता वर्तवली. त्यांनी सांगितले की अमेरिकन सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या.

 म्हणून वाढल्या किंमती

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने कोरोना व्हायरसच्या साथीमुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांना खिळ घालण्यासाठी २ ट्रिलियन डॉलरचे पॅकेज जाहीर केलं होतं. अमेरिकन डॉलरमध्येही घसरण झाली असून धातूंच्या किंमतींना पाठींबा दर्शवला आहे. डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात सोन्याच्या किंमती ४५००० रुपये प्रति १० ग्राम पर्यंत अशी अपेक्षा आहे. 

तांब्याच्या किंमतीबाबत त्यांनी सांगितलं की, मागील आटवड्यात एलएमईमध्ये धातूंच्या किंमतीत संमिश्र परिणाम दिसून आले. अॅल्युमिनिअमच्या किंमतीत सर्वाधिक घसरण दिसून आली. या आठवड्यात बेस मेटलच्या किंमतींमध्ये आणखी घट होईल आणि तांब्याच्या किंमतीत ३९० प्रति किलोग्रामच्या जवळपास असतील अशी आशा आहे. लॉकडाउननंतर किंमत मिळण्यास वेळ लागेल तसेच अनेक देशांनी आर्थिक गतिविधी टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या असल्याने ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.

या आठवड्यातील तेलाच्या किंमतीबाबत बोलताना प्रथमेश माल्या यांनी सांगितलं की, 'लॉकडाऊनचा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या मागणीला मोठा फटका बसला आहे. यासह अमेरिकेच्या क्रूड यादीची पातळ सलग ९ व्या आठवड्यात १.६ दशलक्ष बॅरलने वाढली. त्यामुळे क्रूडच्या नफ्याला आणखी खिळ बसली. या आठवड्यात तेलाच्या किंमती १६०० अंकांनी घसरतील, असा अंदाज आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा