Advertisement

कच्चे तेल ६६ टक्के स्वस्त, पेट्रोल, डिझेलचे भाव मात्र चढेच

सरकारची तिजोरी भरण्यासाठी मार्च ते जूनदरम्यान दोन वेळा पेट्रोलवर १३ रुपये आणि डिझेलवर १६ रुपये कर वाढवला.

कच्चे तेल ६६ टक्के स्वस्त, पेट्रोल, डिझेलचे भाव मात्र चढेच
SHARES

देशात शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागला आहे. पेट्रोल लिटरमागे ५७ पैसे, तर डिझेल ५९ पैसे महाग झाले. सलग सहा दिवसांत पेट्रोलचा दर ३.३१ रुपयांनी, तर डिझेलचा दर ३.४२ रुपयांनी वाढला आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून जगातील अनेक देशांमध्ये लाॅकडाऊन आहे. या देशांमधील सर्वच व्यवहार या काळात ठप्प झाले.  इंधनाचा वापर होत नसल्याने जगभरात कच्चे तेल तब्बल ६६  टक्के स्वस्त झाले. भारत सरकारला स्वस्त इंधन उपलब्ध झाले. मात्र, सरकारने याचा लाभ जनतेला होऊ दिला नाही.

सरकारची तिजोरी भरण्यासाठी मार्च ते जूनदरम्यान दोन वेळा पेट्रोलवर १३ रुपये आणि डिझेलवर १६ रुपये कर वाढवला. तसंच राज्यांनीही व्हॅट वाढवला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याएेवजी महागच झाले. सरकारने हा कर वाढवला नसता तर पेट्रोल-डिझेल आतापेक्षा १५ ते २० रुपयांनी स्वस्त झाले असते.

जानेवारीत कच्च्या तेलाचा भाव प्रति पिंप  ७० डॉलर होता. २० जानेवारीला  ५८ डॉलर भाव झाला. २१ एप्रिलनंतर किमती वाढू लागल्या होत्या. सध्या  कच्च्या तेलाचा भावल दर ३८ डॉलरवर आहे. सध्या  पेट्रोल, डिझेलसाठी लोकांना ७० रुपयांहून अधिक पैसे मोजत आहेत. मात्र, त्याची मूळ किंमत २० रुपयांहून कमी आहे. कराचे प्रमाण अधिक असल्यामुळे  पेट्रोल, डिझेलसाठी जास्त पैसे द्यावे लागत आहेत. 



हेही वाचा -

दिलासादायक! तब्बल 'इतक्या' कॅन्सरग्रस्तांची कोरोनावर मात

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा