Advertisement

पोस्ट ऑफिसमधील नोटा संपल्यामुळे नागरिक त्रस्त


पोस्ट ऑफिसमधील नोटा संपल्यामुळे नागरिक त्रस्त
SHARES

वडाळा -वडाळा पश्चिम परिसरातील जैन देरासलेन मार्गावरील पोस्ट ऑफिसमध्ये दुपारी 1 च्या सुमारास नोटा संपल्यामुळे नागरिकांचा पारा चांगलाच चढला. नोटा संपल्याचे कारण देत रांगेत उभे राहू नका, असं कार्यालयातील कर्मचार्यांनी लोकांना सांंगताच नागरिक वैतागले. रविवार सुट्टीचा दिवस आहे आम्हाला आता नोटा बदलून हव्यात असा नागरिकांनी हट्टाहास धरत हुज्जत घातली. मात्र पोस्टातल्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करत आपली इतर कामे सुरू ठेवली. दरम्यान 5 लाख रुपयांच्या नव्या नोटा पोस्टात जमा होत्या त्या संपल्या त्यामुळे नागरिकांना नोटा कशा व कुठून देणार अशी प्रतिक्रीया पोस्ट कर्मचाऱ्यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा