पेट्रोल पंपावर कार्ड न स्वीकारल्याने वाहन चालकांना फटका

 Mohammad Ali Road
पेट्रोल पंपावर कार्ड न स्वीकारल्याने वाहन चालकांना फटका
पेट्रोल पंपावर कार्ड न स्वीकारल्याने वाहन चालकांना फटका
See all

मोहम्मद अली रोड - मुंबईतील बी विभागातील अनेक पेट्रोल पंपावर कार्ड न स्वीकारण्याच्या निर्णयाचा फटका वाहन चालकांना बसतोय. पेट्रोल पंपावर कार्ड स्वीकारले जात नसल्याने लोकांना एटीएमच्या बाहेर रांग लावावी लागत आहे. त्यातच एटीएममध्ये 2000 हजार रुपयांची नोट येत असल्याने सुट्ट्या पैश्यांचाही त्रास सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोलपंप धारक कार्ड स्वीकारत नसल्याने आम्हाला जिथे सुट्टे पैसे मिळतील तिथे जावे लागते आणि हे शोधण्यातच आमचा वेळ जातोय त्यामुळे कामावर जायला देखील उशीर होतो अशी प्रतिक्रिया अतिश वामन या वाहन चालकाने दिली.

Loading Comments