Advertisement

डिझेल २० पैशांनी स्वस्त, ३२ दिवसांनंतर दर कपात

मागील अनेक काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये आता पेट्रोलचा भाव प्रति लिटर १०० रुपयांच्या वर गेला आहे.

डिझेल २० पैशांनी स्वस्त, ३२ दिवसांनंतर दर कपात
SHARES

भारतीय तेल कंपन्यांनी बुधवारी डिझेलच्या दरात २० पैशांची कपात केली आहे.  त्यामुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. ३२ दिवसांनंतर डिझेलचे दर कमी केले आहेत. पेट्रोलच्या भावात मात्र काहीच बदल करण्यात आलेला नाही. 

मागील अनेक काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये आता पेट्रोलचा भाव प्रति लिटर १०० रुपयांच्या वर गेला आहे. आता डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. मात्र, पेट्रोलचे दर तेवढेच आहेत. 

तेल कंपन्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या नव्या दरांमध्ये डिझेल २० पैसे लिटरने स्वस्त झाले आहे. मुंबईत आता पेट्रोल १०७ रुपये ८३ पैसे लिटर आणि डिझेल ९७ रुपये २४ पैसे लिटर आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा भाव १०१ रुपये ८४ पैसे आणि डिझेलचा दर ८९ रुपये ६७ पैसे लिटर झाला आहे.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. १८ जुलैपासून इंधनाचे दर स्थिर होते. पेट्रोलचे दर १७ जुलै रोजी वधारले होते. १७ जुलै रोजी पेट्रोलच्या दरात ३० पैशांची वाढ पाहायला मिळाली होती, तर डिझेलचे दर स्थिर होते. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा