हेच का कॅशलेस?

दादर - कॅशलेस व्यवहारांना अधिकाधिक चालना देण्यासाठी खासगी बँकांनी बँक व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, 4 पेक्षा जास्त वेळा होणाऱ्या बँक व्यवहारांवर (बँकेत जाऊन केलेल्या व्यवहारांवर) प्रत्येकी 150 रुपयांचं अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. 1 मार्चपासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या खासगी बँकांमध्ये हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र बँकांनी लागू केलेले हे नियम सर्वसामान्य मुंबईकरांना मात्र मान्य नाहीत. मुंबई लाइव्हच्या 'मुंबई बोले तो' या विशेष कार्यक्रमात सर्वसामान्य मुंबईकरांनी या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

Loading Comments